शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील कुठलेही क्षेपणास्त्र राेखणार अमेरिकेचे ‘गोल्डन डोम’ कवच, US ला कुणाचा धोका? 
2
झेलेन्स्कींसारखेच डोनाल्ड ट्रम्प यांचे दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी वाजले; रामाफोसा संबंध सुधारण्यासाठी आलेले...  
3
अबुझमाडच्या जंगलात २७ नक्षलींना कंठस्नान; असे घडले एनकाउंटर
4
आजचे राशीभविष्य, २२ मे २०२५: नशिबाची साथ, मान-सन्मान; यश, कीर्ती, धन प्राप्तीचा दिवस
5
‘ॲापरेशन सिंदूर’नंतर रॉचे अधिकारी मराठवाड्यात; केंद्र सरकारकडून अंतर्गत सुरक्षेचा आढावा घेणे सुरू
6
नाव बसवा राजू... इनाम ५ कोटी... १५ नावांची ओळख अन् बनला सर्वोच्च नेता
7
पाकिस्तानात गृहयुद्ध : स्कूलबसवर हल्ला, सहा जणांचा मृत्यू; मृतांमध्ये तीन बालकांचा समावेश, ३८ जण जखमी 
8
‘पायरसी’मुळे सिनेमाला २२,४०० कोटींचा ‘झटका’; फटका कुणाला?
9
देवनार डम्पिंग ग्राउंडवरील बायोगॅस प्रकल्प २ वर्षांत; राज्य सरकारची मंजुरी; प्रतिदिन १८ टन बायोगॅसची निर्मिती
10
भोसले घराण्याची दौलत आहे ही ७० लाखांची तलवार
11
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
12
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
13
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
14
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
15
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
16
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
17
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
18
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
19
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
20
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा

भररस्त्यात तडफडणाऱ्या गायीला उचलले जेसीबीने !

By admin | Updated: July 9, 2016 00:57 IST

तरुणांनी घेतला पुढाकार : पायाला जखम झाल्याने ‘गोमाता’ हतबल; पालिकेकडून मात्र हात वर; म्हणे ‘मेल्यावर सांगा... आम्ही तिला उचलतो’--लोकमत विशेष

भररस्त्यात तडफडणाऱ्या गायीला उचलले जेसीबीने !तरुणांनी घेतला पुढाकार : पायाला जखम झाल्याने ‘गोमाता’ हतबल; पालिकेकडून मात्र हात वर; म्हणे ‘मेल्यावर सांगा... आम्ही तिला उचलतो’--लोकमत विशेष साई सावंत --सातारा --साताऱ्यातील तपासे मार्ग... नेहमीप्रमाणेच वाहनांची वर्दळ... पण रस्त्यातच एक गाय खूप वेळ बसलेली... वाहतुकीची कोंडी रोखण्यासाठी गायीला हाकलण्याचा प्रयत्न केला; पण ती जखमी असल्याने उठू शकत नसल्याचे लक्षात आले. यासाठी पालिकेला मोबाईल संपर्क साधला; पण पालिकेनेही हात वर केले. शेवटी तरुणांनीच जेसीबी बोलावून तिला सुरक्षित ठिकाणी नेऊन उपचार केले. येथील तपासे मार्गावर शुक्रवारी सकाळी भरगर्दीच्या वेळेत एक गाय जखमी अवस्थेत रस्त्याच्या मधोमध बसली होती. तरुणांनी तिला बाजूला घेण्याचा प्रयत्न केला असता तिच्या पायाला गंभीर जखमी झाली असल्याचे लक्षात आले. त्यामुळे काही तरी उपाययोजना करणे गरजेचे होते. तरुणांनी तत्काळ सातारा पालिकेशीसंपर्क साधून गायीला नेण्याचे आवाहन केले. त्यावेळी पालिकेनेही असमर्थता दाखवून हात वर केले. त्यानंतर वाईल्ड लाईफ संघटनेचे अमित सय्यद यांना बोलावण्यात आले. सय्यद यांनी तत्काळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून उपचार सुरू केले. त्यामुळे गायीमध्ये तरतरी आली. परंतु स्वत: उठून बाजूला जाता येईल एवढाही तिच्यात त्राण शिल्लक नव्हता. गायीची होत असलेली तगमग पाहून तरुणांच्या काळजाचीही घालमेल होत होती. काही करून तिला बाजूला नेणे गरजेचे आहे, हे ओळखून त्यांनी प्रयत्न सुरू केले. जरंडेश्वर येथील गोशाळामध्ये फोन करून गाय घेऊन जाण्यास सांगितले असता. त्यांनीही ‘आमच्याकडे ऐंशी गायी आहेत. त्यामुळे घेऊन जाऊ शकत नाही,’ असे सांगितले. त्यामुळे शेवटी महेश तपासे यांचा जेसीबी बोलावला. जेसीबीच्या पुढील खोऱ्यातून तिला अलगद उचलून पोलिस मुख्यालयाशेजारील झाडाखाली ठेवले आहे. त्याठिकाणी गायीला पाणी पाजून चपाती खाण्यास दिली. ती पूर्ण बरी होईपर्यंत गायीला खाऊ पिऊ घालण्याची जबाबदारी परिसरातील रहिवाशांनी घेतली आहे. महेश तपासे, शौर्यशील माने, मयुर बैताडे, प्रसाद बाबर, किरण कल्पवृक्ष व मित्र मंडळाच्या तरुणांचे कौतुक होत आहे.