वीजचोरी करणाऱ्यांना ‘जोर का झटका’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:15 IST2021-02-05T09:15:19+5:302021-02-05T09:15:19+5:30

पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे, बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांच्या सूचनेनुसार ‘एक दिवस वीजचोरी मुक्ततेचा’ या योजनेंतर्गत ...

'Jor ka jhatka' to power thieves | वीजचोरी करणाऱ्यांना ‘जोर का झटका’

वीजचोरी करणाऱ्यांना ‘जोर का झटका’

पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे, बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांच्या सूचनेनुसार ‘एक दिवस वीजचोरी मुक्ततेचा’ या योजनेंतर्गत वीजचोरीविरोधात महावितरणची सर्वत्र धडक मोहीम राबवण्यात येत आहे. सातारचे अधीक्षक अभियंता गौतम गायकवाड, कऱ्हाडचे कार्यकारी अभियंता अभिमन्यू राख, एस. के. पाटील, उपकार्यकारी अभियंता स्वप्नील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक मोहीम कऱ्हाड परिसरात हाती घेतली आहे. बुधवारी कऱ्हाड ग्रामीण उपविभागांतर्गत मलकापूर शाखेतील मलकापूर, कापील, गोळेश्वर, जखिणवाडी व नांदलापूर या पाच गावांमध्ये ही मोहीम राबविण्यात आली. बुधवारी सकाळी साडेनऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ५३९ ग्राहकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये थेट हुक टाकून मीटर बायपास करून वीजचोरी केल्यामुळे कलम १३५ अंतर्गत २६, तसेच ज्या कारणासाठी वीज पुरवठा केला, त्यापेक्षा वेगळा वापर करणे, घरगुती मीटरवरून व्यावसायिक वापर करत वीजचोरी केल्याप्रकरणी कलम १२६ अंतर्गत ३७ कारवाया करण्यात आल्या. त्यामध्ये दोषी ६३ ग्राहकांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ८ ते ९ लाखावर दंड वसुलीची प्रक्रिया सुरू केली आहे.

- चौकट

अधिकाऱ्यांसह ५० जणांचे पथक सहभागी

शाखा अभियंता युवराज धर्मे, हेमंत येडगे, अमोल साठे, वैभव राजमाने, अभिजित लोखंडे, श्वेता पाटील, अमर पवार, अभिमन्यू पिटके, आशिष भोंगाळे, दीपक मोहिते या अधिकाऱ्यांसह मलकापूर शाखेचे १७, वारूंजी ४, वडगाव ४, शेणोली शाखा ४, वहागाव ४, मुंढे ३, रेठरे ३ अशा ३९ वायरमनसह ५० जणांचे पथक या कारवाईत सहभागी झाले होते.

- चौकट

गावनिहाय दोषी ग्राहक

१) मलकापूर २४

२) कापील २६

३) गोळेश्वर ७

४) जखिणवाडी ४

५) नांदलापूर २

फोटो : २८केआरडी०१

कॅप्शन : मलकापूर सबस्टेशनअंतर्गत वीजचोरी रोखण्यासाठी ग्राहकांची तपासणी करण्यात आली.

Web Title: 'Jor ka jhatka' to power thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.