सातारा : येथील मतकर कॉलनीत झालेल्या घरफोडीतील अट्टल गुन्हेगारास शाहूपुरी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून सुमारे ५० हजार रुपयांचे दागिने व टीव्ही जप्त करण्यात शाहूपुरी पोलिसांना यश आले आहे. या संशयिताकडून आणखी काही घरफोड्या उघडकीस येतील, असा विश्वास पोलीस निरीक्षक मुगुटराव पाटील यांनी व्यक्त केला.दशरथ रामदास कोळी (वय २५, रा. भवानीपेठ, घोंगदेवस्ती, सोलापूर) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जून महिन्यात मतकर कॉलनीत झालेल्या घरफोडीत टीव्ही, सोन्याचे दागिने व इतर ऐवज चोरीस गेला होता. यामध्ये तिघांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते. या गुन्ह्यातील दशरथ कोळी हा पोलिसांना मिळून येत नव्हता.सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुगुटराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार तडवी, फडतरे, कुंभार, माने, कुंभार, पवार, अजित माने, काशीद यांनी कोळी यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून टीव्ही, सुमारे ५० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.कोळी याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस निरीक्षक मुगुटराव पाटील यांनी व्यक्त केली आहे.
अट्टल घरफोड्याकडून दागिने, टीव्ही जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 15:44 IST
सातारा येथील मतकर कॉलनीत झालेल्या घरफोडीतील अट्टल गुन्हेगारास शाहूपुरी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून सुमारे ५० हजार रुपयांचे दागिने व टीव्ही जप्त करण्यात शाहूपुरी पोलिसांना यश आले आहे. या संशयिताकडून आणखी काही घरफोड्या उघडकीस येतील, असा विश्वास पोलीस निरीक्षक मुगुटराव पाटील यांनी व्यक्त केला.
अट्टल घरफोड्याकडून दागिने, टीव्ही जप्त
ठळक मुद्देअट्टल घरफोड्याकडून दागिने, टीव्ही जप्त आणखी काही घरफोड्या उघडकीस येण्याची शक्यता