शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांची तपासणी सांगून तीन तोळ्यांचे दागिने लांबविले, साताऱ्यातील घटना

By दत्ता यादव | Updated: December 6, 2023 15:35 IST

सातारा : ‘पुढे चाैगुले साहेबांच्या भावावर चाकूने वार झालेत, पोलिसांची तपासणी सुरू आहे,’ असे सांगून दोघा भामट्यांनी एका वृद्धाकडून तीन तोळ्यांचे दागिने हातोहात काढून ...

सातारा : ‘पुढे चाैगुले साहेबांच्या भावावर चाकूने वार झालेत, पोलिसांची तपासणी सुरू आहे,’ असे सांगून दोघा भामट्यांनी एका वृद्धाकडून तीन तोळ्यांचे दागिने हातोहात काढून घेऊन फसवणूक केली.या दागिन्यांची किंमत सुमारे दीड लाख रुपये होती. ही घटना दि. ४ रोजी सायंकाळी पावणेपाच वाजता मंगळवार तळ्याजवळ घडली. दरम्यान, या प्रकारानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम हाती घेतले आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिवाजी सीताराम वास्के (वय ७८, रा. मोरे काॅलनी, व्यंकटपुरा पेठ, सातारा) हे सेवानिवृत्त असून, सोमवारी सायंकाळी पावणेपाच वाजता ते मंगळवार तळ्याजवळून चालत निघाले होते. त्यावेळी तेथे दोन तरुण आले. ‘तुम्ही पुढे जाऊ नका, चाैगुले यांच्या भावावर चाकूने वार झालेत. दागिने तुम्हाला कागदाच्या पुडीत व्यवस्थित बांधून देतो,’ असे सांगितले. त्यानंतर वास्के यांनी एक तोळे वजनाची सोन्याची अंगठी तसेच दोन तोळ्यांची चेन काढून दिली. हे दागिने पुडीत बांधत असल्याची हातचलाखी करून चोरट्यांनी स्वत:जवळ काढून घेतले. मात्र, पुडीमध्ये दोन दगडाचे खडे बांधून पुडी त्यांच्याकडे दिली. काही अंतर पुढे गेल्यानंतर वास्के यांनी पुडी उघडली असता त्यामध्ये दोन खडे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या प्रकारानंतर त्यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सहायक फाैजदार एस. एम. गायकवाड हे अधिक तपास करीत आहेत. 

पोलिसांकडून कसोशिने प्रयत्नवृद्धांना फसवणारी टोळी सातारा शहरात गेल्या अनेक दिवसांपासून धुडगूस घालत आहे. वृद्ध लोकांना हेरून त्यांचा गैरफायदा घेतला जात आहे. ही टोळी पकडण्यासाठी पोलिसांकडून कसोशिने प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अद्यापही ही टोळी पोलिसांच्या हाती लागली नाही. त्यामुळे शहरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले आहे.  

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस