शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

जयंत पाटील-श्रीनिवास पाटील यांच्या बंद खोलीतील चर्चेमुळे तर्कवितर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2023 11:50 IST

सातारा लोकसभेसाठी महायुतीकडूनही मोर्चबांधणीला वेग

सातारा : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्ष मोर्चेबांधणी करू लागले असून वरिष्ठ नेत्यांचेही जिल्ह्यात दौरे सुरू होऊ लागले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे फलटण तालुक्याच्या दौऱ्यावर असतानाच, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही अचानक कराड येथे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. भेटीत जवळपास अर्धा ते पाऊण तास कमराबंद चर्चा झाली. भेटीत काय चर्चा झाली, याबाबत तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत.सातारा लोकसभा मतदार संघात पूर्वी राष्ट्रवादी बळकट होती. तथापि, सध्या लोकसभेत सहा मतदार संघांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचा एकच आमदार आहे. उर्वरित पाचपैकी भाजप १, अजित पवार गट १, शिवसेना शिंदे गट २ आणि काँग्रेस १ अशी संख्या आहे. त्यामुळे सर्वच पक्षांकडून उमेदवारीवर दावा केला जात आहे. महायुतीमध्येही साताऱ्याच्या जागेवर तिन्ही पक्षांचे नेते दावा करू लागले आहेत. काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना लोकसभेचे उमेदवारी द्यावी, अशीही मागणी काही दिवसांपूर्वी झाली होती. अशा वेळी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी (शरद पवार) कडूनच उमेदवार ठरवला जाण्याची शक्यता आहे. अद्याप कोणत्याही इच्छुक उमेदवाराने दावा केला नसला तरी खासदार श्रीनिवास पाटील यांचेच नाव पुन्हा एकदा चर्चेत आहे. त्यांच्यापाठोपाठ त्यांचा मुलगा सारंग पाटील यांच्या नावाचीही चर्चा आहे. तथापि, अशा वेळी राष्ट्रवादीकडे अन्य कोणता पर्याय आहे का? याचीही चाचपणी राष्ट्रवादीकडून सुरू आहे. मंगळवारी अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कऱ्हाड येथे भेट दिली. या भेटीत बंद दाराआड चर्चा झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

खासदार पाटील यांच्या पत्नी आजारी असल्याने भेट?खा. श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी आजारी असल्याने ही भेट असल्याचे सांगितले जात आहे; परंतु या भेटीत खासदार आणि प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्यामध्ये कमराबंद चर्चा झाल्याने चर्चेत नक्की काय? याबाबत तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरJayant Patilजयंत पाटील