जवान दत्तात्रय सकुंडे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:39 IST2021-03-17T04:39:57+5:302021-03-17T04:39:57+5:30

वाठार स्टेशन : अंबवडे (सं) वाघोली, ता. कोरेगाव येथील जवान दत्तात्रय बाळकृष्ण सकुंडे (वय ३४) यांचे डेहराडून येथे उपचारादरम्यान ...

Jawan Dattatraya Sakunde passed away | जवान दत्तात्रय सकुंडे यांचे निधन

जवान दत्तात्रय सकुंडे यांचे निधन

वाठार स्टेशन : अंबवडे (सं) वाघोली, ता. कोरेगाव येथील जवान दत्तात्रय बाळकृष्ण सकुंडे (वय ३४) यांचे डेहराडून येथे उपचारादरम्यान निधन झाले. कवायतीसाठी जात असताना चक्कर येऊन पडल्याने त्यांच्या डोक्याला मार लागला होता. त्यामुळे त्यांना तेथील रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

दत्तात्रय सकुंडे हे २००६ मध्ये सैन्य दलात

भरती होऊन ते डेहराडून येथे कर्तव्यावर होते. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वीच

ते सुटीवर गावी अंबवडे येथे आले होते. त्यानंतर ते पुन्हा डेहराडून येथे कर्तव्यावर गेले होते.

आप्पा फौजी म्हणून ते गावात परिचित होते. बुधवार, दि. १७ रोजी सायंकाळी चार वाजता डेहराडूनहून त्याचे पार्थिव पुणे येथे तर तेथून सकुंडे यांच्या मूळ अंबवडे गावी आणण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजयकुमार पाटील यांनी दिली.

१६दत्तात्रय सकुंडे

Web Title: Jawan Dattatraya Sakunde passed away