जावळी गटशिक्षणाधिकारी पदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:44 IST2021-08-12T04:44:23+5:302021-08-12T04:44:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कुडाळ : जावळी तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी पदी अरुणा यादव-भुजबळ यांची नियुक्ती झाली असून सोमवारी त्यांनी आपल्या पदाचा ...

Jawali Group Education Officer | जावळी गटशिक्षणाधिकारी पदी

जावळी गटशिक्षणाधिकारी पदी

लोकमत न्यूज नेटवर्क

कुडाळ : जावळी तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी पदी अरुणा यादव-भुजबळ यांची नियुक्ती झाली असून सोमवारी त्यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला.

अरुणा यादव यांनी सातारा जिल्हा परिषदेत उपशिक्षणाधिकारी त्यानंतर महाबळेश्वर व महाड येथे गटशिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार सांभाळला आहे. या पदावर कार्य करत असताना आपल्या शैक्षणिक व प्रशासकीय व्यवस्थापनाचा एक वेगळा ठसा त्यांनी उमटविला आहे. जावळीच्या गटशिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अखिल भारतीय शिक्षक संघ सातारा, शाखा- जावळी यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी अखिल भारतीय शिक्षक संघाचे मार्गदर्शक दीपक भुजबळ, जावळी तालुका अध्यक्ष संतोष लोहार, जिल्हा उपाध्यक्ष कृष्णत हिरवळे, सरचिटणीस अजित राक्षे, गणेश जाधव, दिनकर कारंडे, हेमंत जाधव, रुपाली जाधव, शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रकांत कर्णे, कार्यालयीन कर्मचारी राधेश्याम मडावी, शैलेश धोंडे, कुलकर्णी, बबन निकम उपस्थित होते.

Web Title: Jawali Group Education Officer