शहरं
Join us  
Trending Stories
1
मनरेगाचं नाव बदलणार, मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता; जाणून घ्या, काय असणार नवं नाव?
2
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
3
अवघ्या WWE चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू तरळणार...! जॉन सीना निवृत्त होतोय, रविवारी शेवटचा सामना....
4
HDFC Bank UPI Downtime: HDFC बँकेची UPI सेवा दोन दिवस ४ तासांसाठी राहणार बंद, पाहा कधी आणि कोणत्या वेळी राहणार बंद
5
'मंत्र्यावर बिबटे सोडा', उद्या पाकिस्तानातील लोक मंत्री म्हणून येतील', सुधीर मुनगंटीवारांचा विधानसभेत पारा चढला!
6
"फेमस व्हायचंय..."; एडल्ट स्टार होण्याचं भलतंच वेड, व्हायरल केला पत्नीसोबतचा खासगी व्हिडीओ
7
Travel : मनालीपासून २० किलोमीटरवर आहे स्वर्गासारखे सुंदर दिसणारे 'हे' ठिकाण! हिमवृष्टी बघून प्रेमात पडाल
8
“कुणबी प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, GR काढून ३ महिने झाले, पण…”; मनोज जरांगे सरकारवर नाराज
9
SMAT 2025 : टीम इंडियातून बाहेर काढलं त्यानं हॅटट्रिकसह पुण्याचं मैदान गाजवलं, पण... (VIDEO)
10
व्हिडीओ कॉल केला आणि तिने कपडे काढून फेकले, मुंबईतील ५० वर्षाचा उद्योजक अडकला 
11
Viral Video: संतापजनक! रेल्वे प्लॅटफॉर्मवर झोपलेला तरुण, तृतीयपंथींचा घोळका त्याच्याजवळ गेला अन्...
12
तंबाखू आणि सिगारेट महागणार! केंद्र सरकारकडून उत्पादन शुल्कात ५ पट वाढ; नवीन किंमत काय असेल?
13
विधानसभेत मंत्री नितेश राणेंची कोपरखळी; "काल चिडलेले होते, वैयक्तिक भेटले तर मिठीही मारतात..."
14
पहिला अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तानच्या मुलीची पंतप्रधानांना साद; 'माझ्यावर वारंवार बलात्कार, मदत करा, न्याय द्या'
15
रिस्क है तो...! कार डीलरचा मुलगा ते शेअर बाजाराचा 'बिग बुल'; हर्षद मेहताचा 'वाद'ळी प्रवास
16
“श्रमलेल्या बापासाठी लेक...”; शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया सुळेंची खास पोस्ट
17
रुपयाचा ऐतिहासिक नीचांक! डॉलरच्या तुलनेत दर ९०.५६ रुपये; घसरण्याची ३ मोठी कारणे समोर
18
एकाच रिचार्जमध्ये मिळणार वाय-फाय, फोन आणि डीटीएच, हा प्लान खूप खास
19
Video - "तुला लाज वाटली नाही?"; नवऱ्याने बायकोला बॉयफ्रेंडसोबत OYO मध्ये रंगेहाथ पकडलं अन्...
20
मुलानं आईला मारलं, मग स्वतःलाही संपवलं; ChatGPT कारणीभूत? OpenAI वर खटला!
Daily Top 2Weekly Top 5

APMC Election Result: जावळी, महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकरी विकास पॅनलकडे; महाविकास आघाडीचा दारूण पराभव

By दीपक शिंदे | Updated: April 29, 2023 13:53 IST

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील यांच्या एकत्रित युतीच्या शेतकरी विकास पॅनलचे घवघवीत यश

कुडाळ : जावळी महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील यांच्या एकत्रित युतीच्या शेतकरी विकास पॅनलने सर्व १८ जागा जिंकून बाजार समिती आपल्या ताब्यात ठेवली आहे. माजी आमदार सदाशिव भाऊ सपकाळ, माजी जि. प. सदस्य दीपक पवार तसेच शिवसेना ठाकरे गट यांच्या एकत्रित महाविकास आघाडीला एकही जागा जिंकता आली नाही.जावली महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न झाले होते. यासाठी आपले सर्व राजकीय संघर्ष बाजूला ठेवून संस्थेवरचा निवडणुकीचा आर्थिक बोजा पडू नये यासाठी तीन आमदार एकत्रित आले. मात्र, या प्रक्रियेत आपल्याला विचारात घेतले नाही असा आरोप करीत आमदार सदाशिव सपकाळ व माजी जि. प. सदस्य दीपक पवार यांनी महाविकास आघाडीचे पॅनल उभे केले. यामुळे शेतकरी विकास पॅनल विरुद्ध महाविकास आघाडीचे पॅनल अशी लढत झाली. शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडली यामध्ये सरासरी ८४ टक्के मतदान झाले. यात महाविकास आघाडी नेमके किती मतदान घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.मेढा येथील बाबासाहेब शिंदे आखाडकर सभागृहात मतमोजणीला सुरुवात झाली. या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलचे महिला प्रतिनिधी योगिता राजेंद्र शिंदे, कमल दिलीप दळवी, इतर मागास प्रवर्गातील मनेष जयसिंग फरांदे, भटक्या विमुक्त जाती प्रवर्गातून तुकाराम जाणू शिंदे, हमाल मापाडी मतदारसंघातून सुंदर गोविंद भालेराव तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रतिनिधीमधून रामचंद्र धोंडीबा भोसले बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित १२ जागांसाठी २२ उमेदवार रिंगणात होते. यात शेतकरी विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांनी मताधिक्याने विजय मिळवला.कृषी पत व बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था मतदार संघ सर्वसाधारण गटातून हनुमंत सहदेव शिंगटे, प्रमोद बाजीराव शेलार, प्रमोद शंकर शिंदे, मच्छिंद्र लक्ष्मण मुळीक, जयदीप शिवाजीराव शिंदे, हेमंत हिंदुराव शिंदे, राजेंद्र सखाराम भिलारे ,ग्रामपंचायत मतदार संघातून अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी म्हणून पांडुरंग नामाजी कारंडे, ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघातून गुलाब विठ्ठल गोळे, बुवासाहेब एकनाथराव पिसाळ तर व्यापारी अडते मतदार संघातून प्रकाश कृष्णाजी जेधे, दत्तात्रय कोंडीबा कदम यांनी विजय मिळवला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMarketबाजारElectionनिवडणूकMahavikas Aghadiमहाविकास आघाडीAPMC Electionकृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक