जनसंघाचे ज्येष्ठ नेते मधुकर पवार यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:46 IST2021-08-18T04:46:00+5:302021-08-18T04:46:00+5:30
कुडाळ : आनेवाडीचे सुपुत्र, जिल्ह्यातील जनसंघाचे ज्येष्ठ नेते मधुकर शिवाजी पवार तथा मधुकर सरस्वती यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी ...

जनसंघाचे ज्येष्ठ नेते मधुकर पवार यांचे निधन
कुडाळ : आनेवाडीचे सुपुत्र, जिल्ह्यातील जनसंघाचे ज्येष्ठ नेते मधुकर शिवाजी पवार तथा मधुकर सरस्वती यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी पुणे येथे सोमवारी निधन झाले. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवून जनसंघाच्या आदेश मानला होता. लहानपणापासून काँग्रेस विरोधी विचारसरणी असल्याने ते जनसंघाचे समर्थक बनले होते. शिक्षकीपेशा सोडून ते राजकारणाशी जोडले होते.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, विश्वास गांगुर्डे, गिरीश बापट, माधव भंडारी, गजाभाऊ कुलकर्णी, डॉ. हर्षे यांच्यासारख्या जनसंघाच्या नेत्यांशी त्यांचा परिचय होता. वसंतदादा पाटील, भि. दा. भिलारे यांच्यासारख्या स्वातंत्र्यसैनिकांविरोधात जनसंघाच्या आदेशाने त्यांनी निवडणूक लढवली होती. आनेवाडी येथील त्रिमूर्ती म्हणून काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जयसिंगराव फरांदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस अशोकराव शिंदे व भाजपचे मधुकर पवार हे राज्यात ओळखले जात होते.
त्यांच्या पश्चात मुलगा, मुली, सून, नातवंड असा मोठा परिवार आहे.
आयकार्ड फोटो
१७मधुकर पवार