शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

विधवा पुनर्विवाह अडकला वादाच्या भोवऱ्यात, पहिली पत्नी असताना करत होता दुसरा विवाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 17:59 IST

दुसरा विवाह केल्याने गुन्हा दाखल

सातारा : सातारा तालुक्यातील जकातवाडी येथे ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडलेला विधवा पुनर्विवाह आता वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. पहिली पत्नी असताना दुसरा विवाह केल्याप्रकरणी पुनर्विवाह करणाऱ्या पतीवरच सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. रमेश शंकर शिंदे (वय ५२, रा. खेड, ता. सातारा) असे गुन्हा दाखल केलेल्या पतीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, जकातवाडी येथे रविवारी राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीदिनी शैला मोरे आणि रमेश शिंदे यांचा विधवा पुनर्विवाह पार पडला. हा ऐतिहासिक विवाह सोहळा मानला जात होता. या सोहळ्याला ग्रामस्थांसह सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या जोडप्याने पुनर्विवाह करून क्रांतिकारी पाऊल टाकल्यामुळे सर्वत्र त्यांचे काैतुक केले जात असतानाच, या प्रकरणाने मंगळवारी वेगळे वळण घेतले. रमेश शिंदे यांची पहिली पत्नी रोहिणी रमेश शिंदे (वय ४८, रा. खेड, ता. सातारा) यांना पतीने हे लग्न केल्याचे समजताच त्यांनी सातारा शहर पोलीस ठाणे गाठले.आमचा घटस्फोट झाला नसताना पतीने शैला मोरे (रा. नुने, ता. सातारा) हिच्याशी दुसरे लग्न केल्याचे त्यांनी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर पोलिसांनी रोहिणी शिंदे यांची तक्रार नोंदवून घेतली. त्यांच्या तक्रारीनुसार सन २००० ते २६ जून २०२२ या कालावधीत पती रमेश शिंदे यांनी वेळोवेळी घरगुती काैटुंबिक कारणावरून मारहाण, शिवीगाळ केली. तसेच शारीरिक, मानसिक छळ केला. आमचा घटस्फोट झाला नसताना सुद्धा त्यांनी जकातवाडी येथे दुसरा विवाह केला. या तक्रारीवरून पोलिसांनी रमेश शिंदेंवर गुन्हा दाखल केला आहे.

क्रांतिकारी पाऊल म्हणून दिला पाठिंबा...

विधवा पुनर्विवाह करताना वराची म्हणे, तोंडी चाैकशी करण्यात आली. त्यावेळी वराने ‘मी अनेक वर्षे स्वतंत्र राहत असून, आमच्यात कोणताही संपर्क नाही,’ अशी माहिती त्यांनी काही ग्रामस्थांना दिली. दोघांची पसंती झाल्यानंतर ते जकातवाडी ग्रामस्थांकडे आले. त्यानंतर एक क्रांतिकारी पाऊल म्हणून या लग्नाला ग्रामस्थांनी पाठिंबा दिला, अशी माहिती आता पुढे येऊ लागली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरmarriageलग्न