जैन साध्वी वीरती प्रज्ञा श्रीजी यांचे निधन
By Admin | Updated: November 9, 2014 22:42 IST2014-11-09T22:42:57+5:302014-11-09T22:42:57+5:30
कऱ्हाड शहरातील जैन समाजाच्या वतीने अंत्ययात्रा (पालखी) सोमवारी सकाळी साडेआठ वाजता काढण्यात येणार आहे

जैन साध्वी वीरती प्रज्ञा श्रीजी यांचे निधन
कऱ्हाड : येथील जैन धर्मशाळेत गेल्या काही दिवसांपासून चातुर्मास धार्मिक विधीसाठी वास्तव्य
असणाऱ्या जैन साध्वी वीरती प्रज्ञा श्रीजी (वय ८२) यांचे वृद्धपकाळाने रविवारी (दि. ९) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास निधन झाले. ही बातमी समजाताच कऱ्हाड शहरातील जैन बांधवांनी आपले व्यवहार बंद करून दुखवटा पाळला. त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी समाजबांधवांनी येथील संभवनाथ जैन मंदिरात गर्दी केली होती.साध्वी वीरती प्रज्ञा श्रीजी यांच्या पार्थिवाची कऱ्हाड शहरातील जैन समाजाच्या वतीने अंत्ययात्रा (पालखी) सोमवारी सकाळी साडेआठ वाजता काढण्यात येणार आहे. ही अंत्ययात्रा येथील जैन मंदिर येथून सुरू होणार असून चावडी चौक, मंगळवार पेठ, पांढरीचा मारूती मार्गे कृष्णा नाक्यावरून दत्त चौक परिसरात येणार आहे. त्यानंतर शनिवार पेठेतील यशवंत हायस्कूलजवळील एका खासगी जागेत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)