जगन्नाथ कांबिरे-पाटील यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:46 IST2021-09-04T04:46:09+5:302021-09-04T04:46:09+5:30
संचालक तात्यासाहेब कांबिरे (पाटील) म्हणाले, ‘गोरखनाथ मोहिते यांनी रेल्वे पोलीस म्हणून काम करताना कर्तव्याच्या पलीकडे जाऊन कोरोनाविषयी जनजागृती करून ...

जगन्नाथ कांबिरे-पाटील यांचा सत्कार
संचालक तात्यासाहेब कांबिरे (पाटील) म्हणाले, ‘गोरखनाथ मोहिते यांनी रेल्वे पोलीस म्हणून काम करताना कर्तव्याच्या पलीकडे जाऊन कोरोनाविषयी जनजागृती करून मसूरचे नाव सातासमुद्रापार पोहोचवले.’
गोरखनाथ मोहिते म्हणाले, ‘माझा अनेक ठिकाणी सत्कार झाला; परंतु कांबिरवाडी (मसूर) या जन्मगावी होत असलेल्या सत्काराने मी भारावून गेलो आहे. गावच्या ग्रामस्थांनी माझ्या पाठीवर टाकलेली कौतुकाची थाप माझ्या पुढील कार्याला प्रेरणा देईल.’
कार्यक्रमास जगन्नाथ कुंभार, बापूसाहेब इंगळे, शंकर कांबिरे, प्रथमेश कुंभार, गणेश कांबिरे उपस्थित होते. शंकर कांबिरे यांनी आभार मानले. (वा. प्र.)
०३मसूर-एडीव्हीटी
कांबिरवाडी (मसूर) येथील सनशाईन ऑईल्स कंपनीच्यावतीने गोरखनाथ मोहिते यांचा जगन्नाथ कांबिरे (पाटील) यांचा सत्कार करण्यात आला.