जे. के. देवीमध्ये ‘नथ-कंगन महोत्सवा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:31 IST2021-01-04T04:31:57+5:302021-01-04T04:31:57+5:30
सातारा : पंचमुखी गणपतीशेजारी असलेल्या जे. के. देवी ज्वेलर्समध्ये लग्नसराईनिमित्ताने ‘नथ-कंगन महोत्सव’ आयोजित केला आहे. यामध्ये नथ, बांगड्यांचे असंख्य ...

जे. के. देवीमध्ये ‘नथ-कंगन महोत्सवा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
सातारा : पंचमुखी गणपतीशेजारी असलेल्या जे. के. देवी ज्वेलर्समध्ये लग्नसराईनिमित्ताने ‘नथ-कंगन महोत्सव’ आयोजित केला आहे. यामध्ये नथ, बांगड्यांचे असंख्य प्रकार उपलब्ध आहेत. हा महोत्सव ३१ जानेवारी २०२१ पर्यंत सुरू असणार आहे.
जे. के. देवी ज्वेलर्समध्ये नथ, कंगनच्या आकर्षक व्हरायटीज पाहावयास मिळणार आहेत. यामध्ये पुणेरी नथ, चापाची नथ, मोत्याची नथ, बानू नथ, मस्तानी नथ, काशीबाई नथ, फॅन्सी नथ, मणी नथ, मोरी नथ, पेशवाई नथ, प्लेन नथ, फ्लोअर नथ असे प्रकार पाहावयास मिळणार होत. बांगड्यांमध्ये प्लेन, कलकत्ती, अँटिक, राजकोटी बांगड्या, पाटल्यांमध्ये प्लेन, कलकत्ती, राजकोटी, पोचोडी पाटल्या, गोटमध्ये प्लेन, पिळाचे, फॅन्सी गोट, तोड्यांमध्ये कल्याणी, शिंदेशाही, कोयरी, बदाम कोयरी, पेशवाई आणि गहू तोडे, कंगनमध्ये फॅन्सी, अँटिक, बॉम्बे आणि कलकत्ती कंगन उपलब्ध आहेत. मुजरीवर १० टक्के सूट देण्यात येेणार आहे. या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जे. के. ज्वेलर्सचे समीर देवी यांनी केले आहे. (वा. प्र.)
फोटो.. T Advt03 jk devi news photo
सातारा येथील पंचमुखी गणपतीशेजारील जे. के. देवी ज्वेलर्समधील नथ-कंगन महोत्सवाला ग्राहकांना प्रतिसाद मिळत आहे.