ग्रेड सेपरेटरच्या शासकीय उद्घाटनाचा मुहूर्त ठरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:18 IST2021-01-24T04:18:55+5:302021-01-24T04:18:55+5:30
सातारा : येथील पोवई नाक्यावर बांधण्यात आलेल्या ग्रेड सेपरेटरच्या शासकीय उद्घाटनाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. २९ जानेवारी रोजी १० ...

ग्रेड सेपरेटरच्या शासकीय उद्घाटनाचा मुहूर्त ठरला
सातारा : येथील पोवई नाक्यावर बांधण्यात आलेल्या ग्रेड सेपरेटरच्या शासकीय उद्घाटनाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. २९ जानेवारी रोजी १० वाजता विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे.
सातारा शहरातील पोवई नाका परिसरामध्ये होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ग्रेड सेपरेटर हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यात आला. अनेक वर्षं या ग्रेड सेपरेटरचे काम सुरू होते
शुक्रवारी होणाऱ्या कार्यक्रमासाठी खासदार उदयनराजे भोसले, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार जयकुमार गोरे, आमदार महेश शिंदे, आमदार दीपक चव्हाण, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एस. जी. मुलगीलवार, कार्यकारी अभियंता शंकर दराडे आदी उपस्थित राहणार आहेत.
ग्रेड सेपरेटर हे साताऱ्यात झालेले उल्लेखनीय काम आहे. पोवई नाक्यावर आठ रस्ते एकत्र येत असल्याने वाहनांची कोंडी होत होती, त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून ग्रेड सेपरेटरचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सुरू होते.
पालिकेकडे होणार हस्तांतरण
ग्रेड सेपरेटरचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने पूर्ण करण्यात आले असून, त्याची देखभाल-दुरुस्ती नगरपालिकेने पाहायची आहे. त्यामुळे हा ग्रेड सेपरेटर काही दिवसांत पालिकेकडे हस्तांतरित केला जाणार असल्याची खात्रीशीर माहिती असून त्याबाबत प्रशासकीय हालचालीदेखील सुरू आहेत.
आधी सीसीटीव्ही बसवा
ग्रेड सेपरेटरच्या उद्घाटनानंतर लावलेला फलक खाली पडला होता. या फलकामुळे सातारा शहरातील वातावरण तंग झाले होते, त्यानंतर संपूर्ण राज्यभर याचे पडसाददेखील उमटले. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने हा फलक फाडून जमिनीवर फेकल्याची अफवा पसरली होती
फोटो नेम : ०९जावेद ३१ प्रूफला
फोटो ओळ : सातारा येथील ग्रेड सेपरेटरमध्ये वाहनांची वर्दळ वाढलेली आहे. सुरक्षेसाठी या ठिकाणी सीसीटीव्ही बसणे आवश्यक आहे. (छाया : जावेद खान)