पश्चिम भागात पुन्हा पाऊस वाढला, साताऱ्यात रिमझिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 06:40 PM2020-08-11T18:40:13+5:302020-08-11T18:41:27+5:30

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर पुन्हा वाढला असून मंगळवारी सकाळपर्यंत कोयनेला ४५, नवजाला येथे ७२ तर महाबळेश्वरला ५९ मिलीमीटर पाऊस पडला. तर नवजाच्या पावसाने या वर्षातील ३ हजार मिलीमीटरचा टप्पाही पार केला. दरम्यान, सातारा शहरात ढगाळ हवामानाबरोबरच रिमझिम पाऊस झाला.

It rained again in the western part, drizzle in Satara | पश्चिम भागात पुन्हा पाऊस वाढला, साताऱ्यात रिमझिम

पश्चिम भागात पुन्हा पाऊस वाढला, साताऱ्यात रिमझिम

googlenewsNext
ठळक मुद्देपश्चिम भागात पुन्हा पाऊस वाढला, साताऱ्यात रिमझिम नवजाला ३ हजार मिलीमीटरचा टप्पा पार

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर पुन्हा वाढला असून मंगळवारी सकाळपर्यंत कोयनेला ४५, नवजाला येथे ७२ तर महाबळेश्वरला ५९ मिलीमीटर पाऊस पडला. तर नवजाच्या पावसाने या वर्षातील ३ हजार मिलीमीटरचा टप्पाही पार केला. दरम्यान, सातारा शहरात ढगाळ हवामानाबरोबरच रिमझिम पाऊस झाला.

मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ४५ तर जूनपासून आतापर्यंत २७६८ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर महाबळेश्वरला ५९ मिलीमीटर पाऊस झाला. तसेच आतापर्यंत महाबळेश्वर येथे २९७२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर नवजाला सकाळपर्यंत सर्वाधिक ७२ आणि आतापर्यंत ३०५० मिलीमीटर पाऊस झाला आहे. या पावसामुळे कोयना धरणात पाण्याची आवक वाढत आहे.

सकाळच्या सुमारास कोयना धरणात १२२५८ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. त्यामुळे धरणातील पाणीसाठा ७५.३३ टीएमसी इतका झाला होता. २४ तासांत धरणसाठ्यात जवळपास एक टीएमसीने वाढ झाली आहे. धरणातून अजुनही विसर्ग सुरू करण्यात आलेला नाही.

Web Title: It rained again in the western part, drizzle in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.