सत्तेपेक्षा विकासाला गती देणे महत्त्वाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:41 IST2021-02-09T04:41:24+5:302021-02-09T04:41:24+5:30
शेणोली, ता.कऱ्हाड येथे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या विकासकामांच्या भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. ...

सत्तेपेक्षा विकासाला गती देणे महत्त्वाचे
शेणोली, ता.कऱ्हाड येथे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या विकासकामांच्या भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते जयवंतराव उर्फ बंडानाना जगताप, कऱ्हाड दक्षिण युवक काँग्रेसचे अध्यक्ष वैभव थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.
जयवंतराव जगताप म्हणाले, शेणोलीतील जनता विकासाच्या पाठीशी ठाम आहे. तुम्ही ग्रामपंचायत निवडणुकीत राजकीय चाल करण्यात कमी पडला. सर्वसामान्य जनता तुमच्या बरोबर आहे. पराभवाची उणीव भरून काढा.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालय ते गणपती आबा कणसे यांच्या घरापर्यंत रस्ता कॉँक्रीटीकरण, गणेश मंदिरासमोर सामाजिक सभागृह बांधणे, तानाजी शिंदे ते चंद्रकांत शिंदे यांच्या घराकडे जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे अशा ३० लाख रुपये खर्चाच्या विकासकामांचा प्रारंभ झाला.
बाजार समितीचे संचालक सचिन गुणवंत, विकास सेवा सोसायटीचे अध्यक्ष निवास गुणवंत, माजी अध्यक्ष सुनील संपत कणसे, दयानंद पाटील, प्रतापराव कणसे, सुनील शामराव कणसे, सर्जेराव कणसे, पोपटराव जगताप आदी उपस्थित होते. अधिकराव चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. प्रतापराव कणसे यांनी आभार मानले. महेश कणसे व पैलवान प्रमोद कणसे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
फोटो : ०८केआरडी०५
कॅप्शन : शेणोली, ता. कऱ्हाड येथील विकासकामांचे भूमिपूजन मनोहर शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी जयवंतराव जगताप, वैभव थोरात आदी उपस्थित होते.