मार्चचा शेवटचा दिवस असल्याने बांधकाम विभाग फुल्ल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:40 IST2021-04-01T04:40:27+5:302021-04-01T04:40:27+5:30

सातारा : मार्च महिन्याच्या अखेरच्या दिवशी बुधवारी सातारा जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागात मोठी गर्दी झाली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही ...

As it is the last day of March, the construction department is full! | मार्चचा शेवटचा दिवस असल्याने बांधकाम विभाग फुल्ल !

मार्चचा शेवटचा दिवस असल्याने बांधकाम विभाग फुल्ल !

सातारा : मार्च महिन्याच्या अखेरच्या दिवशी बुधवारी सातारा जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागात मोठी गर्दी झाली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही दुपारपर्यंत गर्दी कमी झाली नव्हती. यामध्ये ठेकेदारांचा अधिक समावेश होता.

जिल्हा परिषदेअंतर्गत विविध विभाग आहेत. या विभागांना स्वतंत्र निधी देण्यात येतो. यामधून अनेक प्रकारची कामे करण्यात येतात. गेल्या दोन महिन्यांपासून जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आणि अधिकारी विविध विकास कामांसाठी मिळालेला निधी मार्चअखेर खर्च करण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यासाठी बैठकाही झाल्या. संबंधितांना कामे पूर्ण करण्याबाबत सूचनाही करण्यात आली होती.

नवीन आर्थिक वर्ष एप्रिलपासून सुरू होत आहे. त्यापूर्वी मार्चअखेर विविध कामांची बिले निघणे महत्त्वाचे असते. यासाठी गेल्या १५ दिवसांपासून जिल्हा परिषदेच्या विविध विभागात गर्दी होत होती. प्रशासनाने आवाहन करूनही गर्दी काही कमी झाली नाही. बुधवारी मार्च महिन्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे बांधकाम व इतर काही विभागात मोठी गर्दी झाली होती. यामध्ये ठेकेदारांचाही समावेश होता. दुपारपर्यंत गर्दी चांगलीच जाणवली. मात्र, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचा विसर पडल्याचे दिसून आले.

फोटो ३१सातारा zp नावाने...

फोटो ओळ :

सातारा जिल्हा परिषदेत मार्च महिन्याच्या शेवटच्या दिवशी बांधकाम विभागाच्या बाहेर गर्दी झाली होती.

Web Title: As it is the last day of March, the construction department is full!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.