शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात वसतिगृहांची अनुदाने मिळत नाहीत ही शोकांतिका - शरद पवार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2024 12:26 IST

फुले, आंबेडकर साहित्य पंचायतीचे पुरस्कार प्रदान

सातारा : सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत राज्यकर्त्यांकडे आस्था नाही. राज्यात गोरगरिबांच्या मुलांसाठी सुरू करण्यात आलेल्या शिक्षण संस्था व वसतिगृहांची अनुदाने मिळत नाहीत ही पुरोगामी महाराष्ट्रातील शोकांतिका असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले.भारतीय भटके व विमुक्त विकास व संशोधन संस्थेच्या वतीने पुढे आंबेडकर साहित्य पंचायतीच्या वतीने देण्यात येणारा फुले आंबेडकर साहित्य पुरस्कार वितरण कार्यक्रमात पवार बोलत होते. यावेळी माजी खासदार श्रीनिवास पाटील, संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण माने, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, भाई शैलेंद्र माने, यशवंत माने, प्रा. जीवन बोराटे, डॉ. समता जीवन, मच्छिंद्रनाथ जाधव, शशी माने, हरिदास जाधव, नारायण जावलीकर, सुलोचना माने, कादंबरी माने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.पवार म्हणाले, ‘मागील काही दिवसांमध्ये अनुदान थकीत ठेवण्याची मानसिकता राज्यकर्त्यांची वाढली आहे. एकीकडे मोफत योजनांचे गाजर दाखवून मतांचे राजकारण करताना दुसरीकडे गोरगरीब आणि सामान्य यांच्यावर अन्याय होत आहे. राज्यातील गोरगरिबांच्या मुलांसाठी शिक्षण संस्था, वसतिगृहांची अनुदाने मिळत नसल्यामुळे संस्थाचालकांची अडचण होत आहे.’दरम्यान, भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्थेच्या वतीने फुले आंबेडकर साहित्य पंचायतीच्या वतीने देण्यात येणारा फुले आंबेडकर साहित्य पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक डॉ. नागोराव कुंभार, साहित्यिक रामराजे तथा रावणराजे आत्राम यांना संघटनेचा जीवनगौरव पुरस्कार तर लेखक विलासराव माने यांना युवा साहित्य पुरस्काराचे वितरण पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्रीनिवास पाटील यांच्यासह रामराजे आत्राम, विलासराव माने, प्रा. डॉ. नागोराव कुंभार यांनी मनोगत व्यक्त केले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSharad Pawarशरद पवारGovernmentसरकार