पक्षवाढीसाठी प्रयत्न करणाऱ्या नेत्यांविरोधात काहीतरी बोलणं अयोग्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:14 IST2021-02-06T05:14:19+5:302021-02-06T05:14:19+5:30
सातारा : ‘पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडणे पक्षाची संघटना वाढवणे ताकद वाढविणे हे संबंधित नेत्यांचे कामच असते, प्रत्येक जण ...

पक्षवाढीसाठी प्रयत्न करणाऱ्या नेत्यांविरोधात काहीतरी बोलणं अयोग्य
सातारा : ‘पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडणे पक्षाची संघटना वाढवणे ताकद वाढविणे हे संबंधित नेत्यांचे कामच असते, प्रत्येक जण त्यासाठी प्रयत्न करत असतात, परंतु त्याबाबत काहीतरी बोलणे मला योग्य वाटते,’ असे मत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
राष्ट्रवादीचे विधान परिषदेतील आमदार शशिकांत शिंदे, सातारा जावळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात शाब्दिक चकमक सुरू आहे, याबाबत मत विचारले असता शंभुराज देसाई म्हणाले, हा विषय दोन पक्षांमधील आहे. आमदार शिंदे करतात, तर शिवेंद्रसिंहराजे भाजपचे प्रतिनिधित्व करतात. दोन्ही पक्षांच्या कार्यप्रणालीचा हा मुद्दा आहे. जे लोक पक्षाचे प्रतिनिधित्व करतात, अशा लोकांवर पक्ष वाढ करणे, पक्ष संघटना मजबूत करणे, पक्षाची ताकद वाढवत राहणे ही जबाबदारी असते. ही जबाबदारी पार पाडत असताना त्यांच्याबाबत काहीतरी बोलने मला योग्य वाटत नाही. मराठा आरक्षणाची सुनावणी ८ मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. राज्य सरकारतर्फे समितीचे प्रमुख अशोक चव्हाण यांनी आपली बाजू मांडली आहे. राज्य सरकारच्या वतीने दिल्लीतील मोठी फौज मराठा आरक्षणाची राज्य सरकारतर्फे बाजू मांडत आहेत. राज्य सरकार ताकदीने या विषयात समाजासोबत आहे, असे शंभूराजे देसाई म्हणाले.
तसेच अवैध व्यवसायांवर धाडी टाकण्याचे काम पोलिसांतर्फे नियमितपणे केले जात असते, त्यांच्या कामाचा एक भाग आहे. राज्यात पोलीस १०० टक्के कार्यक्षमतेने काम करत आहेत, असेही मंत्री देसाई म्हणाले.