इरफान बागवान शांतीदूत सेवारत्न पुरस्काराने सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:17 IST2021-02-05T09:17:39+5:302021-02-05T09:17:39+5:30
सातारा : गेली पंधरा वर्षे जिल्हा शांतता कमिटी सदस्यपदी असणारे सदस्य इरफान बागवान यांना उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुणे येथे शांतीदूत ...

इरफान बागवान शांतीदूत सेवारत्न पुरस्काराने सन्मानित
सातारा : गेली पंधरा वर्षे जिल्हा शांतता कमिटी सदस्यपदी असणारे सदस्य इरफान बागवान यांना उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुणे येथे शांतीदूत परिवारातर्फे राज्यस्तरीय शांतीदूत सेवारत्न २०२१ पुरस्काराने गौरवण्यात आले. गेली पंधरा वर्षांच्या कामगिरीसाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. त्यांनी देशातील जातीय घडलेल्या घडामोडीनंतर साताऱ्यामध्ये हिंदू-मुस्लिम ऐक्य राखण्याची उत्कृष्ट कामगिरी आजपर्यंत केली आहे. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे मार्केट कमिटीचे सभापती विक्रम पवार, सचिव रघुनाथ मनवे व आडत व्यापारी बी. वाय. घोरपडे, सोमनाथ धुमाळ, अल्लाउद्दीन शेख,चाँदभाई अत्तार, शफिक शेख, मोहम्मद अली बागवान, बबलू केंडे, राजू गोरे, पोपटराव धनावडे, अब्बूशेठ बागवान यांनी त्यांचे कौतुक केले. (वा.प्र.)
फोटो आहे...
०१बागवान
पुणे येथे शांतीदूत परिवारातर्फे इरफान बागवान यांना राज्यस्तरीय शांतीदूत सेवारत्न २०२१ पुरस्काराने गौरविण्यात आले.