‘प्लॅँचेट’च्या नादात तपास खोळंबला

By Admin | Updated: August 12, 2014 23:15 IST2014-08-12T22:37:19+5:302014-08-12T23:15:17+5:30

हौतात्म्याला एक वर्ष...

The investigation of the placentate was dropped | ‘प्लॅँचेट’च्या नादात तपास खोळंबला

‘प्लॅँचेट’च्या नादात तपास खोळंबला

सचिन काकडे - सातारा-- डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी शेवटपर्यंत अंधश्रद्धेविरुद्ध लढा दिला. त्यांच्या या लढ्याने अंधश्रद्धेची जळमटं काढून टाकण्याचे मोठे काम झाले. यामुळे लोकांची मानसिकताच बदलून गेली. मात्र, पुरोगामी महाराष्ट्रात दाभोलकरांच्या खुनाचा तपास करण्यासाठी पोलीस प्रशासनाने ‘प्लॅँचेट’सारख्या प्रकराचा आधार घ्यावा, ही बाबच मुळात अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी आणि लांछनास्पद अशीच आहे, अशी प्रतिक्रिया साताऱ्यातील शिक्षकांमधून व्यक्त होत आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला २० आॅगस्ट रोजी एक वर्ष होत आहे, तरीही पोलिसांना खुन्यांचा अद्याप कसलाच सुगावा लागला नाही. सर्व बाजूंनी तपास केल्यांनतरही खुन्यांचा सुगावा लागत नसल्याने पोलिसांकडून अंधश्रद्धेला खतपाणी खालणाऱ्या ‘प्लॅँचेट’सारख्या प्रकाराचा वापर झाल्यानंतर या कृत्याला सर्व स्तरातून विरोध दर्शविण्यात आला. याबाबत साताऱ्यातील शिक्षकांतून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असून त्यांनी ‘प्लॅँचेट’सारख्या प्रकाराबात नागरिकांत जागृती करणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे.

Web Title: The investigation of the placentate was dropped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.