महाबळेश्वरात रंगणार आंतरराष्ट्रीय पोलो स्पर्धा

By Admin | Updated: December 2, 2015 00:40 IST2015-12-01T22:51:27+5:302015-12-02T00:40:47+5:30

सी विद्यासागर राव : पोलो मैदानाच्या पुनरुज्जीवनासाठी प्रयत्नशील

International Polo Tournament in Mahabaleshwar | महाबळेश्वरात रंगणार आंतरराष्ट्रीय पोलो स्पर्धा

महाबळेश्वरात रंगणार आंतरराष्ट्रीय पोलो स्पर्धा

महाबळेश्वर : येथील जुन्या पोलो मैदानाचे पुनरुज्जीवन करून तेथे आंतरराष्ट्रीय पोलो टूर्नामेंट आयोजित करण्याची सूचना राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी केली आहे. आंतरराष्ट्रीय पोलो टूर्नामेंटच्या माध्यमातून महाबळेश्वरचे तसेच सातारा जिल्ह्याचे नाव जगाच्या नकाशावर येईल हे लक्षात घेऊन पोलो ग्राउंडचे पुनरुज्जीवन करण्यासाठी शासनामार्फत
सर्वतोपरी प्रयत्न करण्यात यावेत, अशी सूचनाही राज्यपालांनी यावेळी केली.या संदर्भात राजभवन येथे आयोजित केलेल्या बैठकीला वित्त व नियोजन, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, वन सचिव विकास खारगे, पर्यटन विभागाच्या सचिव वल्सा नायर सिंह, महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाचे व्यवस्थापक पराग जैन, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, ज्येष्ठ क्रीडा समीक्षक अनुपम गुलाटी, क्रीडा संयोजक कॅप्टन आर. मोहन यांच्यासह पोलो असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.एप्रिल २०१६ मध्ये होणाऱ्या प्रदर्शनीय पोलो सामन्याव्यतिरिक्त महाबळेश्वर येथे दरवर्षी कायमस्वरूपी पोलो स्पर्धांची आखणी करावी तसेच पोलो स्पर्धांसोबत स्ट्रॉबेरी महोत्सवासारखे इतर कार्यक्रम देखील आखण्यात यावेत, जेणेकरून पर्यटकांना एकाच वेळी विविध कार्यक्रमांचा अस्वाद घेता येईल, अशी सूचना राज्यपाल राव यांनी यावेळी केली. यासंदर्भात पोलो असोसिएशनचे पदाधिकारी तसेच वन विभागाचे अधिकारी यांनी मैदानाची संयुक्त पाहणी करावी, आवश्यक त्या परवानग्या प्राप्त कराव्या तसेच इको टुरिझमच्या दृष्टीने देखील विचार करावा, असे निर्देश राज्यपालांनी अधिकाऱ्यांना दिले.सातारा ही शिवाजी महाराजांची भूमी आहे. अश्वारोहण व अश्वस्पर्धेचा या जिल्ह्याला वारसा लाभला आहे. पोलो हा खेळ हेरिटेज प्रकारात मोडतो. त्यामुळे या खेळाला चालना देण्यासाठी उद्योग जगताचा सामाजिक दायित्व निधी मिळू शकतो का? याबाबत चाचपणी करावी, अशी सूचना
सुधीर मुनगंटीवार यांनी  केली. (प्रतिनिधी)


जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती
पोलो स्पर्धेच्या आयोजनासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक जिल्हा आयोजन समिती स्थापन करावी. वन परीक्षेत्रचे उपसंरक्षक या समितीचे सदस्य सचिव असतील. याशिवाय भारतीय पोलो संघटनेचे सदस्य व पर्यटन विभागाचे अधिकारी या समितीचे सदस्य असतील, अशी घोषणा मुनगंटीवार यांनी यावेळी केली.

Web Title: International Polo Tournament in Mahabaleshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.