वाईत दिग्गजांचे मनसुबे मिळाले धुळीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:12 IST2021-02-05T09:12:10+5:302021-02-05T09:12:10+5:30
वाई : वाई तालुक्यात ७६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या असून तालुक्यातील एकूण ९९ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षणासाठी सोडत वाईच्या तहसील ...

वाईत दिग्गजांचे मनसुबे मिळाले धुळीला
वाई : वाई तालुक्यात ७६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या असून तालुक्यातील एकूण ९९ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षणासाठी सोडत वाईच्या तहसील कार्यालयात प्रांताधिकारी संगीता राजापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी तहसीलदार रणजित भोसले, गटविकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
तालुक्यातील ११ ग्रामपंचायतीची सरपंचपदे अनुसूचित जाती-जमाती, २७ ग्रामपंचायतीची सरपंचपदे ओबीसीसाठी तर ६१ ग्रामपंचायतींची सरपंचपदे सर्वसाधारण प्रवर्गासाठी निश्चित झाली आहेत. पसरणीमध्ये सरपंचपद अनुसूचित जातीसाठी निश्चित झाले असून निवडून आलेल्या सदस्यांमध्ये त्या वर्गातील उमेदवारच निवडून आलेला नाही, त्यामुळे महत्त्वाच्या गावांतील सरपंचपदासाठी सत्ताधाऱ्यांना विरोधकांकडे मनधरणी करून पायघड्या घालाव्या लागणार आहेत. त्यामुळे वाई तालुक्यातील सरपंचपदाच्या सोडतीने अनेक दिग्गजांचे मनसुबे धुळीला मिळाले आहेत तर पसरणीमध्ये विरोधी गटातून निवडून येऊनसुद्धा हेमलता गायकवाड यांना सरपंचपदाची संधी प्राप्त झाली आहे.
अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी ९ ग्रामपंचायती सरपंचपदासाठी निश्चित झाल्या आहेत. त्यामध्ये ५० टक्के म्हणजेच पाच पदे ही महिलांसाठी आरक्षित करण्यात आली आहेत. यामध्ये गोवेदिगर, बावधन, वेळे, सुरूर, खावली तर अनुसूचित जाती खुला प्रवर्ग यामध्ये अनवडी, बोरीव, केंजळ, पसरणी या गावांचा समावेश आहे तसेच अनुसूचित जमातीसाठी दोन ग्रामपंचायती आरक्षित करण्यात आल्या आहेत. यामध्ये अनुसूचित जमाती महिलांसाठी खडकी तर ओझर्डे ही ग्रामपंचायत अनुसूचित जमातीसाठी खुल्या प्रवर्गात निश्चित झाली आहे, त्याचप्रमाणे नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) साठी २७ ग्रामपंचायती आरक्षित झाल्या असून यामध्ये १४ ग्रामपंचायती या महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. यामध्ये आसरे, विरमाडे, सुलतानपूर, मेणवली, वाघजाईवाडी, नागेवाडी, वरखडवाडी, चांदवडी (पुन), धोम (पुन), निकमवाडी, मुंगसेवाडी, काळंगवाडी, चिंधवली, बालेघर, तर नागरिकांचा मागास वर्ग खुल्या गटासाठी भुईंज, धावडी, देगांव, अमृतवाडी, भोगांव, गोळेगांव, किरुंडे, किकली, शहाबाग, शेलारवाडी, वयगांव, वाशिवली, गुळुंब या गावंचा समावेश आहे. वाई तालुक्यात सर्वसाधारण प्रवर्गासाठी ६१ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली यामध्ये महिलांसाठी ३१ ग्रामपंचायती निश्चित करण्यात आल्या यामध्ये अभेपुरी, आसले, आकोशी, बेलमाची, भिवडी (पुन.) चांदक, चिखली, दह्याट, जांभळी, कवठे, कुसगांव, कळंबे, खानापूर, मुगांव, परखंदी, पांडे, रेनावळे, शिरगांव, शेंदूरजणे, उळूब , उडतारे, वहागांव, यशवंतनगर, अनपटवाडी, एकसर, जोर, कोंढवली, ओहोळी, वेरुळी, वेलंग, व्याजवाडी, तर सर्वसाधारण खुला प्रवर्ग यामध्ये बोपर्डी, बोपेगांव, बोरगांव, चोराचीवाडी, धोम, जांब, कनूर, कडेगांव, कोंढवळे, खोलवडी, लोहारे, मालतपूर, मोहोडेकरवाडी, मांढरदेव, नांदगणे, परतवाडी, पाचवड, पांडेवाडी, पांढरेचीवाडी, राऊतवाडी, सटालेवाडी, वडोली, व्याहाळी(पुन), वासोळे, विठ्ठलवाडी, दसवाडी, दरेवाडी, गाढवेवाडी, गुंडेवाडी, लगडवाडी, या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.