ऊस का तुडवला विचारल्याने सासू-सुनेला शिवीगाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:38 IST2021-03-25T04:38:01+5:302021-03-25T04:38:01+5:30
सातारा : तालुक्यातील बसाप्पाचीवाडी येथील खोडका नावाच्या दळे शिवारात ‘आमचा ऊस का तुडवत चालला आहात?’ असे विचारल्याच्या कारणावरुन सासू ...

ऊस का तुडवला विचारल्याने सासू-सुनेला शिवीगाळ
सातारा : तालुक्यातील बसाप्पाचीवाडी येथील खोडका नावाच्या दळे शिवारात ‘आमचा ऊस का तुडवत चालला आहात?’ असे विचारल्याच्या कारणावरुन सासू आणि सुनेला शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर धावून जात गर्दी जमवल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दहाजणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
गुलाब उर्फ राहुल चव्हाण, अक्षय चव्हाण, किसन चव्हाण, निखील चव्हाण, महादेव चव्हाण, सुहास चव्हाण, राजेंद्र चव्हाण, यमुना चव्हाण, मंदा चव्हाण, पमा चव्हाण (सर्व रा. बसाप्पाचीवाडी, ता. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सुमन अंकुश चव्हाण (वय ५६, रा. बसाप्पाचीवाडी, पो. वडूथ, ता. सातारा) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, खोडका नावाच्या दळे शिवारातील जमिनीवर त्यांनी ऊस लागवड केली आहे. या ऊस शेतीतून गुलाब उर्फ राहुल किसन चव्हाण आणि त्याच्यासोबत असलेले अक्षय चव्हाण, किसन चव्हाण, निखील चव्हाण, महादेव चव्हाण, सुहास चव्हाण, राजेंद्र पांडुरंग चव्हाण, यमुना चव्हाण, मंदा चव्हाण, पमा चव्हाण हे निघाले होते. यावेळी सुमन चव्हाण यांनी गुलाब चव्हाण याला ‘आमच्या शेतातील ऊस का तुडवतोस’, अशी विचारणा केली. याचा राग गुलाबला आल्यामुळे त्याने सुमन आणि त्यांची सून मनिषा या दोघींना शिवीगाळ, दमदाटी करत आम्ही येथूनच जाणार, असे सांगत अंगावर धावून गेला. ही घटना २३ रोजी दुपारी पावणेएक वाजण्याच्या सुमारास घडली असून, याप्रकरणी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास सातारा तालुका पोलीस ठाण्यात दहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.