शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

अपुरे मनुष्यबळ अन् बेडची संख्या कधी वाढणार?, सातारा जिल्हा रुग्णालयातील त्रुटींवरून पत्रकार अन् पालकमंत्र्यांमध्ये खडाजंगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2023 11:22 IST

सातारा : नांदेड शासकीय रुग्णालयातील मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर राज्य शासन सतर्क झाले असून शुक्रवारी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हा रुग्णालयाची ...

सातारा : नांदेड शासकीय रुग्णालयातील मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर राज्य शासन सतर्क झाले असून शुक्रवारी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हा रुग्णालयाची पाहणी केली. त्यांनी अधिकाऱ्यांना कागदी घोडे नाचवू नका, सर्व रुग्णालयांमध्ये सहा महिन्यांचा औषधसाठा उपलब्ध ठेवा, असे फर्मान सोडले. यानंतरच्या पत्रकार परिषदेत त्यांनी जिल्हा रुग्णालयातील अस्वच्छता, अपुरे बेड आणि कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरून पत्रकार आणि पालकमंत्र्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. तर नादुरुस्त ड्रेनेज व्यवस्थेच्या नूतनीकरणासाठी सहा कोटी नियोजनमधून मंजूर झाल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.नांदेडच्या रुग्णालयात अनेक रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर सरकार ॲक्शन मोडवर आले आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शुक्रवारी सकाळी जिल्हा शासकीय रुग्णालयाला भेट दिली. त्यांच्याबरोबर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलिस अधीक्षक समीर शेख, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. युवराज करपे, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. महेश खलिपे उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी अतिदक्षता विभागाला भेट दिली. अतिदक्षता विभागातील बेडची क्षमता, रुग्णांवर वेळीच उपचार होतात का? अडचणी काय आहेत का, याची वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. औषधसाठ्याची माहिती घेतली. स्थानिकस्तरावर औषध खरेदीचा निर्णय झाला आहे. त्याप्रमाणे नियोजन करा, असेही फर्मानही सोडले.पालकमंत्री यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषेदत जिल्हा रुग्णालयातील कमी बेडसंख्या आणि अपुरे मनुष्यबळ यावरून प्रश्नांच्या सरबत्तीने निरुत्तर होऊन पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी, मी उत्तर द्यायला बंधनकारक नाही, असे सांगत एमपीएससीद्वारे भरती प्रक्रिया सुरू असल्याचे आणि मेडिकल कॉलेजचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ५०० बेड उपलब्ध होतील, असे सांगितले. रुग्णालयाच्या स्थापनेपासूनचे २४१ बेड आहेत ते कधी वाढणार आणि पुरेसे मनष्यबळ कधी उपलब्ध होणार, या प्रश्नावरून चांगलीच खडाजंगी झाली.यावेळी जिल्हा रुग्णालयातील ड्रेनेज व्यवस्था आधुनिक करण्यासाठी सहा कोटींचा निधी मंजूर झाला असून महिनाभरात काम सुरू होईल, औषध साठ्यासाठी ११ कोटींचा निधी उपलब्ध असल्याची माहिती दिली. सर्व ग्रामीण रुग्णालये एकच मॉडेलनुसार बनवण्यात येणार असून स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि स्मार्ट शाळांसाठी निधी दिला जाईल, असे सांगितले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरShambhuraj Desaiशंभूराज देसाईJournalistपत्रकारhospitalहॉस्पिटल