शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation: आक्रमक आंदोलनाऐवजी सकारात्मक विचार करावा, मंत्री शंभूराज देसाईंचा जरांगेंना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 17:19 IST

अभ्यासू नेत्यांचे सरकार..

सातारा : ‘मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार संवेदनशील असून केव्हाही मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करण्यास तयार आहे. त्यामुळे आक्रमक आंदोलन करण्याऐवजी सकारात्मक विचार होणे आवश्यक आहे,’ असा सल्ला पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जरांगे यांना दिला.सातारा येथे पालकमंत्री कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.देसाई म्हणाले, ‘मी यापूर्वीच्या सरकारमध्येमराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचा सदस्य होतो. त्यामुळे वेळोवेळी जरांगे-पाटील यांच्याशी चर्चा केली असून, त्यांच्या मागण्या समजून घेतल्या आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना अनेक प्रश्न मार्गी लावले. कुणबी नोंदी शोधणे, जस्टीस शिंदे समितीला मुदतवाढ देणे या महत्त्वाच्या मागण्या पूर्ण झाल्या. तरी काही मागण्या प्रलंबित राहिल्या आहेत. यामुळे जरांगे-पाटील हे आंदोलन करत आहेत. त्याची दखल सरकार घेईल आणि त्यांच्याशी सकारात्मक चर्चा करेल.शिंदे सरकारच्या काळात जरांगे यांचे आंदाेलन चांगल्या प्रकारे हाताळले गेले; पण फडणवीस सरकारला हाताळता येत नसल्याची चर्चा लोकांमध्ये असल्याबाबत छेडले असता देसाई यांनी ‘यावर मी काय बोलू’ असा प्रतिप्रश्न केला. तसेच मी महायुती सरकार म्हणून सांगेन की राज्य सरकार दिलेली आश्वासने पूर्ण करण्यापासून कुठेही मागे हटणार नाही, शेवटी ही सरकारची संयुक्त जबाबदारी आहे. उपसमिती जरांगे-पाटील यांच्याशी मुद्देसूद चर्चा करण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

अभ्यासू नेत्यांचे सरकार..एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना दहा टक्के आरक्षण मिळाले. कुणबी नोंदी उपलब्ध झाल्या. या नोंदींवर आधारित नोकऱ्या मिळाल्या. महायुती सरकार हे अभ्यासू नेत्यांचे सरकार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार या प्रश्नात नक्कीच लक्ष घालतील, असेही देसाई यांनी स्पष्ट केले.