शहरं
Join us  
Trending Stories
1
यशस्वी जैस्वालच्या अडचणी वाढल्या, NADA नं बजावली नोटीस; शेफाली वर्माही कारवाईच्या रडारवर
2
भारत-पाकिस्तानमध्ये पडद्याआड चर्चा? गेल्या तीन महिन्यात दोन बैठका, समोर येतेय अशी माहिती
3
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
4
गळाभेट घेतली, नमस्कार केला, पंतप्रधान मोदी भर मंचावर कुणासमोर झाले नतमस्तक, ती ज्येष्ठ व्यक्ती कोण?
5
प्रेम विवाहाला ३ महिने पूर्ण होण्याआधीच मोनिकाचा संशयास्पद मृत्यू; जळत्या चितेतून पोलिसांनी बाहेर काढला मृतदेह
6
Budget Travel: खिशात ५० हजार अन् परदेश वारी! 'या' ७ देशांमध्ये भारतीय रुपया आहे लय भारी
7
सामुद्रिक शास्त्र : डोळा लवणे शुभ की अशुभ? स्त्री आणि पुरुषांसाठी काय आहेत याचे वेगवेगळे अर्थ!
8
महागड्या Personal Loan ला विसरा; PPF खात्यावर मिळवू शकता स्वस्त कर्ज, जाणून घ्या नियम
9
Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव   
10
Astro Tips: देवापर्यंत प्रार्थना पोहोचली हे कसे ओळखावे? पूजेदरम्यान मिळणाऱ्या 'या' ५ खुणांचा नेमका अर्थ
11
पंतप्रधान मोदींचा करिष्मा अन् अमित शाहांची चाणक्यनीती पश्चिम बंगालमध्ये यशस्वी- एकनाथ शिंदे
12
युझवेंद्र चहल ई-सिगारेट पिताना दिसला, पण कारवाई मात्र अर्शदीप सिंगवर होणार? जाणून घ्या प्रकरण
13
"६००० कोटींची शासकीय जमीन खासगी बिल्डर्सच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव"; काँग्रेसचा आरोप
14
पेट्रोल पंपांवर मोफत मिळतात 'या' ६ सुविधा; पैसे मागितले तर करू शकता तक्रार, जाणून घ्या तुमचा अधिकार
15
Nashik TCS Case: निदा खानचा हैदराबादला पळण्याचा प्लॅन कसा फसला? एआयएमआयएम नेत्याचा मोबाईल सापडला अन्...
16
Astrology: तुमचा जन्म सकाळचा की रात्रीचा? जन्मवेळ सांगते तुमच्या स्वभावाचे विशिष्ट पैलू!
17
घरबसल्या दरमहा कमवू शकता २० हजार रुपये; जाणून घ्या Post Officeच्या या सुपरहिट योजनेचं गणित
18
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
19
एज व्हेरिफिकेशन करताना इंटरनेट कंपन्यांच्या नाकी नऊ; खोट्या दाढी-मिशा लावून मुलं करतायत सिस्टिमची फसवणूक!
20
‘मुलीच्या डोक्यावर केस कमी आहेत...’ सांगत साखरपुडा मोडला, 'खरं' कारण कळताच सगळ्यांचा संताप झाला!
Daily Top 2Weekly Top 5

जळणाविना झटपट गरम पाणी!

By admin | Updated: January 13, 2015 00:15 IST

जंगलतोडीवर उतारा : भेकवली वन व्यवस्थापन समितीतर्फे ग्रामस्थांना बंबाचे वाटप

महाबळेश्वर : जंगलांचे रक्षण व्हावे, यासाठी वन विभाग महाबळेश्वर व संयुक्त वन व्यवस्थापन समिती भेकवली यांच्या संयुक्त विद्यमाने भेकवली ग्रामस्थांना गरम पाणी करण्याच्या बंबाचे वितरण वनपाल एस. बी . भंडारे, एस. सी केळगणे, (अध्यक्ष, संयुक्त वन व्यवस्थापन समिती भेकवली), आर. टी .लोहार (वनरक्षक तथा सचिव भेकवली), सरपंच, एस. एम. केळगणे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी वनरक्षक ए .ए. मलप, एल.डी. राऊत आदी मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम वनखात्याच्या लिंगमाळा विश्रामगृहाच्या प्रांगणात झाला .
महाबळेश्वर वन परिक्षेत्रातील वृक्षतोड कमी व्हावी तसेच येथील वनांचे, वन्यजीव व वन्यसंपत्तीचे रक्षण व्हावे, यासाठी एन. आर . प्रवीण, उपवनसंरक्षक सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली महाबळेश्वर तालुक्यात विविध योजना राबविल्या जात आहेत. या योजना राबवित असताना वनाचे रक्षण होईल व स्थानिकांचीही गरज भागेल या गोष्टींचा विचार केला जात आहे. अंघोळीसाठी गरम पाणी करण्यासाठी वृक्षतोड न करता खाली पडलेल्या पाला पाचोळा, वाळक्या काटक्या, सुका कचरा यावर पेटविता येणाऱ्या गरम पाण्याचे बंब यापैकी एक असून, याचा ग्रामस्थांनी लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी एस. बी . भंडारे यांनी केले. भेकावल ग्रामस्थांना या बंबाचे वाटप करण्यात आले. भविष्यात संपूर्ण गावच सरपणमुक्त करणार असल्याचा विश्वास एस. सी. केळगणे यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)