यशश्री आजी-माजी सैनिक संघाचा उद्देश प्रेरणादायी : भोसले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:50 IST2021-02-20T05:50:46+5:302021-02-20T05:50:46+5:30
गोपूज येथे यशश्री आजी- माजी सैनिक संघटनेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सेवानिवृत्त कॅप्टन बबन धुमाळ, जयसिंग घार्गे, वसंत ...

यशश्री आजी-माजी सैनिक संघाचा उद्देश प्रेरणादायी : भोसले
गोपूज येथे यशश्री आजी- माजी सैनिक संघटनेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सेवानिवृत्त कॅप्टन बबन धुमाळ, जयसिंग घार्गे, वसंत पवार, धनाजी आमले, मानसिंग जाधव, संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पवार, उपाध्यक्ष सुभेदार अरविंद डावरे, खजिनदार अनिल शिंदे, सचिव विजय जाधव, सुभेदार दिलीप जाधव, ग्रामसेवक सुनील राजगुरू, तलाठी चव्हाण यांचेसह गावातील सर्व आजी- माजी सैनिक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भोसले म्हणाले, ‘पूर्वीच्या काळी सैन्यात भरती होण्यासाठी कोणाचेही मार्गदर्शन सहजासहजी मिळत नव्हते. मात्र, आता निवृत्त होऊन येणारे गावागावातील माजी सैनिक, तसेच सुटीवर येणारे जवान आपापल्या गावातील युवकांना मार्गदर्शन करताना दिसून येत आहेत. यशश्री संघटनेने सुद्धा गावातील जास्तीत जास्त युवक सैन्यदलात जाण्यासाठी त्यांना मदत करावी. भविष्यात गोपूज हे सैनिकांचे गाव म्हणून ओळखावे यासाठी प्रयत्न करायला हवेत.’
यावेळी बबन धुमाळ, धनाजी आमले यांनीही मार्गदर्शन केले. किसन घार्गे यांनी सूत्रसंचालन केले, तर ज्ञानेश्वर पवार यांनी आभार मानले.