पाचवड-कोडोलीच्या प्रस्तावित पुलाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:13 IST2021-02-05T09:13:27+5:302021-02-05T09:13:27+5:30

यावेळी रयत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड. उदयसिंह पाटील, डॉ. इंद्रजीत मोहिते, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, महाराष्ट्र प्रदेश युवक ...

Inspection of the proposed bridge at Pachwad-Kodoli | पाचवड-कोडोलीच्या प्रस्तावित पुलाची पाहणी

पाचवड-कोडोलीच्या प्रस्तावित पुलाची पाहणी

यावेळी रयत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड. उदयसिंह पाटील, डॉ. इंद्रजीत मोहिते, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, जिल्हा अल्पसंख्याक काँग्रेसचे अध्यक्ष झाकीर पठाण, कऱ्हाड शहर काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र माने, मलकापूर शहर काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र यादव, इंद्रजीत चव्हाण, राहुल चव्हाण, कोडोलीचे ग्रामपंचायत सदस्य विक्रम पाटील, मुकुंद पाटील यांच्यासह बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, कऱ्हाड शहरातील वाहतुकीचा वाढता ताण नियंत्रित करण्यात महत्त्वाचा असणारा व दोन खोऱ्यांना जोडणारा कोडोली-पाचवड हा कृष्णा नदीवरील पूल उभारल्यामुळे दळणवळण अधिक सुकर होणार आहे. या परिसराचा विकास होणार आहे. हा पूल राष्ट्रीय महामार्गाला जोडला जाणार आहे. या पुलासाठी ४५ कोटींचा निधी मंजूर झाला असून, पाण्यातील धर तपासण्यासाठी बोरवेलचा प्रारंभ करण्यात आला आहे. बांधकाम विभागाकडून लवकरच या पुलाच्या उभारणीचे काम सुरू केले जाणार आहे.

फोटो : ०२केआरडी०३

कॅप्शन : कऱ्हाड तालुक्यात पाचवड येथे कृष्णा नदीवर उभारल्या जाणाऱ्या पुलाच्या बांधकामाचा प्रारंभ माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी पुलाचा आराखडा समजावून घेत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

Web Title: Inspection of the proposed bridge at Pachwad-Kodoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.