बॉक्सिंग सामन्यात जखमी होऊन

By Admin | Updated: September 8, 2015 21:48 IST2015-09-08T21:48:48+5:302015-09-08T21:48:48+5:30

खटावच्या जवानाचा दुर्दैवी अंत

Injured in boxing match | बॉक्सिंग सामन्यात जखमी होऊन

बॉक्सिंग सामन्यात जखमी होऊन

खटाव : सीमा सुरक्षा दलात कार्यरत असलेले खटाव गावचे सुपुत्र मन्सूर जहांगीर आगा (वय २४) यांचे बॉक्सिंगच्या सामन्यात वर्मी दुखापत झाल्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने खटाव गावावर शोककळा पसरली आहे.मन्सूर आगा चार वर्षांपूर्वी सीमा सुरक्षा दलात भरती झाले होते. बॉक्सिंगमध्ये वाकबगार असलेल्या मन्सूर यांनी अनेक पदकेही मिळवली आहेत. कोलकता येथे कार्यरत असताना ते बॉक्सिंग स्पर्धेस गेले होते. सामना सुरू असताना त्यांना वर्मी दुखापत झाली आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला.
त्याच्या पश्चात पत्नी, भाऊ, आई-वडील असा परिवार आहे. हरहुन्नरी असणारे मन्सूर आपल्यात नसल्याच्या धक्कादायक बातमीने सर्वांनाच शोक अनावर झाला आहे. बुधवारी (दि. ९) खास विमानाने जवान मन्सूर यांचा मृतदेह पुणे येथे येणार असून तेथून तो खटावला आणण्यात येईल. गावातील सर्व तरुण मंडळांनी जवान मन्सूर यांना श्रध्दांजली वाहणारे फलक चौकाचौकात लावले आहेत. मन्सूर यांच्यावर शासकीय इंतमामात अंत्यसंस्कार होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. खटावमधील सर्व व्यवहार बंद ठेवून जवान मन्सूर यांना श्रद्धांजली वाहिली जाणार आहे. (वार्ताहर)

Web Title: Injured in boxing match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.