वसंतगडावर बसविले महितीदर्शक फलक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:19 IST2021-01-24T04:19:17+5:302021-01-24T04:19:17+5:30

वसंतगड किल्ल्यावर येथील दुर्गसंवर्धनाचे कार्य करणाऱ्या ‘टीम वसंतगड’च्यावतीने विविध उपक्रम आयोजित केले जातात. गडावरील ऐतिहासिक वास्तूंची डागडुजी करण्यासह श्रमदानही ...

Information boards installed at Vasantgad | वसंतगडावर बसविले महितीदर्शक फलक

वसंतगडावर बसविले महितीदर्शक फलक

वसंतगड किल्ल्यावर येथील दुर्गसंवर्धनाचे कार्य करणाऱ्या ‘टीम वसंतगड’च्यावतीने विविध उपक्रम आयोजित केले जातात. गडावरील ऐतिहासिक वास्तूंची डागडुजी करण्यासह श्रमदानही केले जाते. यापूंर्वी गडावर श्रमदानातून स्वच्छता करण्यात आली आहे. तसेच बुरूजाचे ढासळलेले दगडही त्यांनी व्यवस्थित ठेवले आहेत. त्यामुळे गडाचे संवर्धन होण्याबरोबरच गड सुंदर आणि स्वच्छ राहत आहे. गडावर जाण्यासाठी उत्तर तसेच दक्षिण बाजूकडून दोन वाटा आहेत. अनेकवेळा पर्यटक तसेच गडप्रेमींना पुरेशी माहिती नसते. त्यामुळे गडावर जाताना त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. याचा विचार करून आणि पर्यटकांना तसेच गडप्रेमींना किल्ल्याची माहिती व्हावी. रस्ता सापडावा यासाठी वसंतगडावर ठिकठिकाणी महितीदर्शक फलक बसवण्याचा निर्णय टीम वसंतगडच्या सदस्यांनी घेतला होता. त्यानुसार फलक बसविण्यात आले असून त्या फलकाचे अनावरण व छत्रपती शंभूराजे यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त प्रतिमेच पूजन असा संयुक्त कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी टीम वसंतगडचे सदस्य तसेच दुर्गपेमी उपस्थित होते. यावेळी सर्वांनी गडसंवर्धन मोहिमेअंतर्गत गडावर श्रमदानही केले.

फोटो : २३केआरडी०२

कॅप्शन : कऱ्हाड तालुक्यातील वसंतगडावर दुर्गप्रेमींच्यावतीने माहितीदर्शक फलक बसविण्यात आले असून त्याचे अनावरण करण्यात आले.

Web Title: Information boards installed at Vasantgad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.