शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

उंब्रज दरोड्यातील चौघांना पकडले, स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केल्याची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 16:06 IST

उंब्रज, ता. कऱ्हाड येथे वृद्धेचा खून करून पाच ठिकाणी दरोडा टाकणाऱ्या टोळीतील चौघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केल्याची माहिती पुढे येत आहे. चार दिवसांपूर्वी उंब्रज येथे मध्यरात्रीच्या सुमारास दरोडेखोरांनी पाच ठिकाणी दरोडा टाकून सुमारे दहा लाखांचा ऐवज लंपास केला होता. त्यावेळी एका वृध्देचा खून करण्यात आला होता.

ठळक मुद्देउंब्रज येथे मध्यरात्रीच्या सुमारास दरोडेखोरांनी पाच ठिकाणी दरोडा चोरीवेळी दरोडेखोरांनी टेम्पोचा वापरचौघांच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या

सातारा : उंब्रज, ता. कऱ्हाड येथे वृद्धेचा खून करून पाच ठिकाणी दरोडा टाकणाऱ्या टोळीतील चौघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केल्याची माहिती पुढे येत आहे.याबाबत माहिती अशी की, चार दिवसांपूर्वी मंगळवारी रात्री उंब्रजमध्ये चोरट्यांनी पाच ठिकाणी दरोडा टाकला. यामध्ये बाजारपेठतील उद्योजक मुल्ला कुटुंबीयांच्या बंगल्यात मागील बाजूने दरोडेखोर आत शिरले होते. चोरी करताना जैनुबी करीम मुल्ला (वय ८६) या जाग्या झाल्याने दरोडेखोरांनी तोंडावर उशी दाबून त्यांचा खून केला. याठिकाणी ३० तोळे सोने लुटून दरोडेखोर पुढे पांडुरंग कुंभार यांच्या घरी गेले.

या ठिकाणी सुमारे पाच तोळे सोन्यांचे दागिने तसेच दहा हजार रुपये रोख रक्कम दरोडेखोरांनी लंपास केली. त्याचबरोबर अन्य तीन ठिकाणीही या टोळीने दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र ते यशस्वी झाले नाहीत. त्यानंतर दरोडेखोरांनी राष्ट्रीय महामार्गावरील शिवडे गावालगत असलेल्या इडली कामत हॉटेलमध्येही पहाटेच्या सुमारास चोरी केली.

ही घटना समजल्यानंतर रात्रीच्या सुमारासच पोलिस घटनास्थळी त्वरित दाखल झाले. तर सकाळी ठसेतज्ज्ञ व श्वान पथक आले होते. त्यांच्याकडून तपास सुरू होता. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, पोलिस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पोलिसांना तपासाच्या सूचना केल्या.

ही टोळी सातारा जिल्बाहेरील असून, प्रत्येकजण किमान सहा फुटांपेक्षा अधिक उंचीचा असल्याचेही पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या चोरीवेळी दरोडेखोरांनी टेम्पोचा वापर केला होता. या दरोड्यातील चौघांच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या आहेत.

 

टॅग्स :Crimeगुन्हाSatara areaसातारा परिसर