डासांचा उपद्रव वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:44 IST2021-09-05T04:44:19+5:302021-09-05T04:44:19+5:30
शेतकऱ्यांची लगबग सातारा : मागील काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे खरिपातील पिके सुकू लागली आहेत. त्यामुळे या पिकांना पाणी ...

डासांचा उपद्रव वाढला
शेतकऱ्यांची लगबग
सातारा : मागील काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे खरिपातील पिके सुकू लागली आहेत. त्यामुळे या पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. हवामानात कमालीचा बदल झाला असून, कधी कडक उन, तर कधी ढगाळ हवामान राहत आहे. त्यामुळे पिकांना पाण्याची गरज भासत आहे.
नियम पाळण्याचे आवाहन
सातारा : श्रावण मासातील सण-समारंभात गर्दी होत असल्यामुळे ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग पुन्हा फैलावण्याचा धोका आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांनी फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्याची गरज आहे.
झगमगाटाला फाटा
सातारा : गेल्या दीड वर्षांपासून सुरू असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी होऊ लागला आहे. यावर्षीदेखील गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आवाहन केले आहे. यावर्षीही गणेश मूर्तींवर उंचीची मर्यादा असून, मिरवणुकांबाबतही साशंकता आहे. त्यामुळे यंदाही गणेशोत्सवातील झगमटाला फाटा मिळणार आहे. दरम्यान, गावोगावी पोलीस प्रशासनातर्फे गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचा धडका सुरू झाला आहे.
अपघाताचा धोका
सातारा : शहर परिसरातून जाणाऱ्या पुणे-बंगळूर महामार्गावरील वाढे फाटा येथील उड्डाणपुलाखाली मोठ-मोठे खड्डे पडले असल्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. वाढे फाटा परिसरातील उड्डाण पुलाखालून अनेक ठिकाणी छेद रस्ते गेले आहेत. त्यामुळे वाहनांची वर्दळ असते.
पुनर्वसनाची मागणी
सातारा : पिसाडी (ता. जावली) गावचे पुनर्वसन करा, अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे मुख्य वनसंरक्षक तथा सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोल्हापूरचे क्षेत्र संचालक समाधान चव्हाण यांच्याकडे केली आहे. यावेळी राम पवार, श्रीरंग देवरूखे, पांडुरंग माने, रामचंद्र मरागजे, धोंडिबा मरागजे, मोहन कोकरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
......................