सातारा : राज्य शासनाच्या उद्योग विभागाकडून नागेवाडी (ता. सातारा) येथील ४२ हेक्टर ८७ आर इतकी जागा ‘आयटी पार्क’ उभारण्यासाठी ‘औद्योगिक क्षेत्र’ म्हणून जाहीर केले. अनेक दिवसांपासून प्रतीक्षा लागलेल्या आयटी पार्कची अधिसूचना निघाल्यामुळे आयटी पार्क प्रकल्प उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.सातारा जिल्ह्यातील आयटी क्षेत्राशी निगडित अभियंते आणि युवक-युवतींना साताऱ्यातच रोजगाराची संधी मिळाली पाहिजे. स्थानिकांना पुणे, मुंबई यासह देशातील अन्य शहरांत नोकरीसाठी जावे लागू नये, यासाठी सातारा तालुक्यातील नागेवाडी (लिंब खिंड) येथील शासकीय जागेत ‘आयटी पार्क’ उभारण्यात यावा, अशी मागणी सातारकरांतून अनेक वर्षांपासून होती. यासाठी राज्य शासनाकडे वारंवार मागणी सुरू होती. काही दिवसांपूर्वीच या जागेची पाहणी एमआयडीसी विभागामार्फत करण्यात आली होती. त्याचा परिपूर्ण अहवाल आणि प्रस्ताव राज्य शासनाकडे काही दिवसांपूर्वी सादर करण्यात आला होता.सादर केलेल्या प्रस्तावाला उद्योग विभागाने मान्यता द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे, तसेच उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली होती. अखेर उद्योग विभागामार्फत नागेवाडी, ता. सातारा येथील गट नं. ३०८/१ येथील ४२ हेक्टर ८७ आर क्षेत्र आयटी पार्क यासाठी आरक्षित करण्याची अधिसूचना जारी करण्यात आली. तसेच, या जागेला औद्योगिक क्षेत्र म्हणून मान्यता मिळाली आहे, असे शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले.
सातारा जिल्ह्यात आयटी पार्क उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच पुढील कार्यवाही गतीने केली जाणार आहे. पुढील कार्यवाही गतीने होण्यासाठी आवश्यक सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत. - शिवेंद्रसिंहराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री
Web Summary : Satara's IT park project progresses as land receives industrial area status. This opens doors for local job opportunities, reducing the need for residents to seek employment in other cities.
Web Summary : सतारा में आईटी पार्क परियोजना आगे बढ़ी क्योंकि भूमि को औद्योगिक क्षेत्र का दर्जा मिला। इससे स्थानीय नौकरी के अवसर खुलते हैं, जिससे निवासियों को अन्य शहरों में रोजगार की तलाश करने की आवश्यकता कम हो जाती है।