सदरबझार, तांदूळआळी येथे देशी दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:33 IST2021-05-03T04:33:49+5:302021-05-03T04:33:49+5:30
सातारा : येथील सदरबझारमधील म्हाडा कॉलनी आणि तांदूळ आळी येथील एका बोळात पोलिसांनी देशी दारू जप्त केली. सदरबझार येथील ...

सदरबझार, तांदूळआळी येथे देशी दारू जप्त
सातारा : येथील सदरबझारमधील म्हाडा कॉलनी आणि तांदूळ आळी येथील एका बोळात पोलिसांनी देशी दारू जप्त केली. सदरबझार येथील कारवाई सातारा शहर पोलीस तर तांदूळ आळी परिसरातील कारवाई शाहूपुरी पोलिसांनी केली आहे. दोन्ही कारवाईत स्वप्नील घुसाळे आणि सागर खोले याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सातारा येथील सदरबझार परिसरातील भीमाबाई आंंबेडकरनगर येथील म्हाडा कॉलनीतील खोली नंबर नऊच्या तळमजल्यातून सातारा शहर पोलिसांनी ४४२० रुपयांची देशी दारू जप्त केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी स्वप्नील सुभाष घुसाळे (रा. भीमाबाई आंबेडकरनगर, म्हाडा कॉलनी, सदरबझार, सातारा) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्याला प्रतिबंधात्मक नोटीस बजावण्यात आली असून, पोलिसांनीच हा गुन्हा दाखल केला आहे.
शाहूपुरी पोलीस ठाण्यातून देण्यात आलेल्या माहितीनूसार, तांदूळआळी ते चांदना चौक जाणाऱ्या रस्त्यावर असणाऱ्या नगरवाचनालयासमोरील एका बोळातील आडोशाला २३२० रुपयांची देशी दारू जप्त करण्यात आली. याप्रकरणी कटलरी व्यावसायिक सागर राजेंद्र खोले (वय २९, रा. खणआळी, सातारा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, खोले यालाही प्रतिबंधात्मक नोटीस बजावण्यात आली आहे.