ईदसाठी सुकामेव्याला वाढती मागणी
By Admin | Updated: July 15, 2015 21:15 IST2015-07-15T21:15:04+5:302015-07-15T21:15:04+5:30
खरेदीवर परिणाम : नमाज पठणात पावसासाठी प्रार्थना

ईदसाठी सुकामेव्याला वाढती मागणी
सातारा : येत्या शनिवारी साजरी होणारी रमजान ईदसाठी बाजारात मागील आठवड्यापासून सुखामेवासाठी मागणी वाढली आहे. गत वर्षाच्या तुलनेत यंदा सुखामेव्यात कोणतीच वाढ झाली नसली तरी लांबणीवर पडलेल्या पावसामुळे मागील वर्षापेक्षा १० ते २० टक्के खरेदीवर परिणाम झाला आहे.महिनाभराच्या उपवासाची सांगता ‘रमजान ईद’ने होते. रमजान ईद ही ‘शिरखुमा’ या मेनूशिवाय साजरी होवू शकत नाही. त्यामुळे ईदला सुखामेव्याची मोठी उलाढाल होत असते. यावर्षी मात्र, या चित्रात चांगलाच फरक असल्याचे जाणवत आहे.
काजू, बदाम, चारोळे, मनुका, पिस्ता, खारीक, खजूर, आक्रोड, खसखस, शेवई आदी वस्तूने दुकाने सजली आहेत. साधारणत: २०० ते ३०० रुपये प्रति २५० ग्रॅम वजनी किंमत आहे. गतवर्षीच्या तुलनेत फक्त पिस्त्याचे दर वाढले आहेत. तसेच रमजान महिन्यात खास करुन उपवासासाठी ओली खजूरालाही मोठी मागणी असून बाजारात विदेशातून मोठ्या प्रमाणात विविध जातीचे खजूर दाखल झाले आहेत. (प्रतिनिधी)
पावसासाठी प्रार्थना
रमजान महिना हा मुस्लिम समाजात पवित्र मानला जातो. यंदाची ईद ही पावसाळ्यात आली आहे. पावसाळा सुरु होऊन देखील पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे नमाज पठणात पावसासाठी प्रार्थना केली जात आहे. वेळेत पाऊस पडला तर सर्वत्र ईदचा आनंद द्विगुणीत होईल.
- मौलाना जमीर, सातारा.
विक्रीत घट
जागतिक मंदी व लांबणीवर पडलेल्या पावसामुळे यंदा बाजारात गतीवर्षीपेक्षा १० ते २० टक्के विक्री घटली आहे. ग्राहकांची संख्या तीच असली तरी ग्राहकांनी यंदा सुका मेवा घेण्यात काटकसर दाखवली आहे. त्यामुळे विक्रीत घट दिसून येत आहे.
- रेहान कच्छी,
मसाले व्यावसायिक