कोयना, केरासह मोरणा नदीपात्रातील पाणी पातळीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:25 AM2021-06-21T04:25:43+5:302021-06-21T04:25:43+5:30

रामापूर : गेल्या दोन दिवसांपासून पाटण शहरात आणि तालुक्यात सुरू असलेली संततधार पर्जन्यवृष्टीमुळे कोयना, केरा आणि मोरणा नदीच्या पाणी ...

Increase in water level in Morna river basin including Koyna, Kera | कोयना, केरासह मोरणा नदीपात्रातील पाणी पातळीत वाढ

कोयना, केरासह मोरणा नदीपात्रातील पाणी पातळीत वाढ

Next

रामापूर : गेल्या दोन दिवसांपासून पाटण शहरात आणि तालुक्यात सुरू असलेली संततधार पर्जन्यवृष्टीमुळे कोयना, केरा आणि मोरणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दोन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे पाटण तालुक्यातील सर्व महसुली मंडळात दोनशे मिलिमीटर पावसाच्या नोंदी झाल्या आहेत. या पावसामुळे तालुक्यातील पुराची परिस्थिती निर्माण झाली होती. ती शुक्रवार सकाळपासून पूर्वपदावर येत आहे. नदीची पाणी पातळी ही पूर्वपदावर येत आहे

पाटण शहरासह तालुक्यात बुधवारी आणि गुरुवारी मुसळधार पावसामुळे ओढे आणि नदीला मोठ्या प्रमाणात आले होते. काही ठिकाणी रस्त्यातेच वाहून गेले. काही ठिकाणी रस्त्यावर असणाऱ्या फरशी पुलाच्या जलवाहिन्याही वाहून गेल्या आहेत. यामुळे ग्रामीण भागातील वाहतूक ठप्प झाली. पाटण तालुक्यात दोन दिवसाच्या पावसामुळे केरा विभागातील आंबवणे, चिटेघर, केरळ आदी ठिकाणी शेतीचे खूप मोठे नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे. या पावसामुळे या विभागातील केरा नदी शेजारी असणाऱ्या विजेच्या मोटारीही वाहून गेल्या आहेत. शेतकऱ्यांच्या शेतीचेही मोठे नुकसान झाल्याने त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट आले आहे. पाटण शहरात सकल भागात पाणी शिरले होते ते पाणी आता ओसरू लागले आहे

येराड मंडळात ३१० मिलिमीटर

पाटण तालुक्यात दोन दिवसाच्या पावसामुळे केरा विभागातील आंबवणे, चिटेघर, केरळ आदी ठिकाणी शेतीचे खूप मोठे नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे. या पावसामुळे या विभागातील केरा नदीशेजारी असणारे लाईटच्या मोटारीही वाहून गेल्या आहेत. शेतकऱ्याच्या शेतीचे ही मोठे नुकसान झाल्याने त्याच्यावर दुबार पेरणीचे संकट आले आहे. पाटण शहरात सकल भागात पाणी शिरले होते. ते पाणी आता ओसरू लागले आहे. अधूनमधून मोठी पावसाची सर येत आहे.

दोन दिवसात झालेल्या पाऊस मिलिमीटरमध्ये

मंडल गुरुवार शुक्रवार एकूण

पाटण १८५ ६५ २५०

म्हावशी १२० ३४ १५४

हेळवाक १५३ ८७ २४०

मरळी १०१ २६ १२७

मोरगिरी १५९ ९५ २५४

ढेबेवाडी ११२ २७ १३९

चाफळ १२६ २७ १५३

तारळे १०३ २३ १२६

मल्हारपेठ ११३ ४१ १५४

तलमावले १४२ ४३ १८५

कुठरे १२९ ३१ १६०

येराड १७० १४० ३१०

आवर्डे १२० ६० १८०

मारुल १७० ५८ २२८

Web Title: Increase in water level in Morna river basin including Koyna, Kera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.