‘कारटेप’चा आवाज वाढवून रस्त्यावर तरुणाईचा ‘एन्जॉय’

By Admin | Updated: May 25, 2016 23:39 IST2016-05-25T22:20:53+5:302016-05-25T23:39:51+5:30

सदर बझार परिसर : रात्री उशिरापर्यंत रंगतायत युवकांच्या गप्पा

Increase the sound of 'karatepat' on the road, 'joy' | ‘कारटेप’चा आवाज वाढवून रस्त्यावर तरुणाईचा ‘एन्जॉय’

‘कारटेप’चा आवाज वाढवून रस्त्यावर तरुणाईचा ‘एन्जॉय’

प्रदीप यादव --सातारा -वेळ : रात्री साडेबाराची. स्थळ : सदर बझार पोलिस चौकी परिसर. ‘लोकमत टीम’ सातारा शहरातील रात्रीच्या घडामोडी टिपण्यासाठी रस्त्यावरून फिरत असतानाच वाऱ्याच्या झुळूकेबरोबर कानावर गाण्यांचा आवाज पडला. आवाजाच्या दिशेने गेलो असता सदर बझार पोलिस चौकीसमोर एका चारचाकीमध्ये साऊंडसिस्टिम सुरू करून काही युवक मोठ्या आवाज गाणी ऐकत बसलेले दिसले. दिवसभर काम थकलेले काही मित्र एकत्र कट्ट्यावर बसून संगीताचा आनंद घेत होते.
मनस्वी जगत नाही, ती तरुणाई कसली, याचेच दृश्य याठिकाणी पाहायला मिळाले. सगळं शहर झोपी गेलं असताना काही युवक चारचाकीची दारं उघडी ठेवून संगीत ऐकत मोबाईलवरील अ‍ॅप्स एकमेकांना शेअर करत होते.
हे दृश्य कॅमेऱ्यात टिपून ‘लोकमत टीम’ जिल्हा परिषद चौकात पोहोचली. येथे कुत्र्यांची गुरगूर शांतता भंग करत होती. उकाड्यामुळे या चौकातही एक वयस्क जोडपे शतपावली करताना दिसले. थंड हवेत गप्पा मारत ते आजी-आजोबा रस्त्याने फिरत होते.
गुरुवार परज परिसरात सव्वा एक वाजता पोहोचलो. शॉपिंग हॉलच्या समोर कष्टावलेली शरीरं विश्रांती घेत होती. प्रत्येक दुकानासमोर काही लोक झोपले होते. जणू काही ते दुकानांची रखवालदारीच करत असावेत, असे ते चित्र होते.

कर्मवीर पथावर मध्यरात्री ‘काऊ वॉक’
दिवस असो किंवा रात्र सातारच्या रस्त्यावर नेहमी भटक्या जनावरांचा वावर असल्याचे पाहायला मिळते. मात्र, यंदा उन्हाचे चटके जरा जास्त बसू लागल्याने दिवसभर मोकाट जनावरे झाडांच्या आडोशाला किंवा इमारतीच्या सावलीला रवंथ करत बसलेली असतात. त्यामुळे सातारच्या रस्त्यांवर दिवसभर केवळ वाहनांची वर्दळ दिसते.
सूर्य मावळतीला गेला की मग बैठक मारुन बसलेली जनावरे मोकाट फिरायला सज्ज होतात आणि रात्रभर इकडून तिकडे चाऱ्यासाठी भटकत असतात. ‘लोकमत टीम’ रात्रीचा सातारा आपल्या कॅमेऱ्यात टिपत असतानाच कर्मवीर पथावर दहा-बारा गायी एका पाठोपाठ चालत निघाल्याचे दिसले. कर्मवीर पथावरील हे ‘काऊवॉक’ शिस्तीचे दर्शन घडवत होते. मात्र याच रस्त्यावरून दिवसा व रात्रीही वाहनधारक बेशिस्तीचे दर्शन घडवत असताना अनेकांनी पाहिले आहे. कचराकुंड्यामध्ये घास शोधण्यासाठी रात्री-बेरात्री या जनावरांची धडपड सुरू होती.

Web Title: Increase the sound of 'karatepat' on the road, 'joy'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.