शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कलेढोण परिसरात भुरट्या चोऱ्यांत वाढ, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण, पोलिसांकडून बंदोबस्ताची मागणी; घरासमोरील बोकडही गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 12:56 IST

खटाव तालुक्यातील कलेढोण परिसरामध्ये भुरट्या चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. आठवड्याच्या बाजारादिवशी या चोऱ्यांच्या घटनेत लक्षणीय वाढ झालेली असते, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भुरट्या चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.

ठळक मुद्देभुरट्या चोरट्यांनी घातला बाजारात धुमाकूळ भुरट्या चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी लहान वस्तूंमुळेच पोलिसांत तक्रार नाही

मायणी : खटाव तालुक्यातील कलेढोण परिसरामध्ये भुरट्या चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. आठवड्याच्या बाजारादिवशी या चोऱ्यांच्या घटनेत लक्षणीय वाढ झालेली असते, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भुरट्या चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.कलेढोण हे मध्यवर्ती बाजारपेठचे ठिकाण आहे. याठिकाणी आठवडा बाजारही भरतो. या बाजारात परिसरातील लहान-मोठ्या गावांतून व्यापारी, शेतकरी व कष्टकरी येत असतात. आठवड्यातूनच एकच वेळ सर्व गोष्टी मिळत असल्यामुळे मोठी गर्दी होत असते. याच गर्दीचा फायदा घेत भुरट्या चोरट्यांनी बाजारात धुमाकूळ घातला आहे.ग्रामीण रुग्णालयाच्या रस्त्याकडेला असणाऱ्या  सिंधू रघुनाथ बुधावले यांच्या घराबाहेरील बोकड उचलून नेल्याची घटना घडली. तसेच आठवडा बाजारातून राहुल महाजन, भाईलाल मुलाणी, अमीर मुजावर, बालम मुलाणी व मागील बाजारात अन्य व्यक्तींचे मोबाईल चोरट्यांनी लंपास केले आहेत.

या आठवडा बाजारातून एका महिलेचे दागिने तसेच बाजारासाठी लालेल्यांच्या व व्यापाऱ्यांचे पैसे चोरीला गेले असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.लहान वस्तूंमुळेच पोलिसांत तक्रार नाहीव्यक्तीचे मोबाईल, पैसे, महिलांचे पर्स, दागिने व इतर जाता-जाता चोरी करता येतील अशा वस्तूंच्या चोरीत वाढ झाली आहे. कोणतीही वस्तू किंवा मोबाईल लंपास तिचा तपास लागत नाही व लहान वस्तू असल्यामुळे कोणी पोलिसांत तक्रार ही करत नाही. त्यामुळे या भुरट्या चोरांचे व चोरीचे प्रमाणही वाढले आहे.

टॅग्स :crimeगुन्हेSatara areaसातारा परिसर