ग्रामीण भागात कोरोना लसीकरणाचे प्रमाण वाढवावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:41 IST2021-05-11T04:41:30+5:302021-05-11T04:41:30+5:30
निवेदनात म्हटले आहे की, कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकतेच उंडाळे येथे ग्रामीण रुग्णालयात कोरोना रुग्णांच्या ...

ग्रामीण भागात कोरोना लसीकरणाचे प्रमाण वाढवावे
निवेदनात म्हटले आहे की, कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकतेच उंडाळे येथे ग्रामीण रुग्णालयात कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी ३० बेडचे लोकार्पण केले. त्याचसोबत उंडाळे ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी ३० लाख रुपये आमदार निधीतून दिले जाईल, अशी घोषणा केली आहे. ही बाब चांगली आहे पण त्याबरोबरच कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावापासून जनतेला प्रतिबंधित करण्यासाठी लसीकरण मोठ्या प्रमाणात झाले पाहिजे.
उंडाळे, ओंड, सवादे, साळशिरंबे, घोगाव, येणपे आदी गावांसाठी लसीकरण उंडाळे ग्रामीण रुग्णालयात राबविले जाते; परंतु येथे लसीचा तुटवडा दिसून येतो तसेच गावनिहाय वाटप होत नाही यासाठी उपलब्ध लसींचे गावनिहाय योग्य वाटप व्हावे जेणेकरून लसीकरण उत्तम प्रकारे राबविता येईल.
लसीचा तुटवडा व घोळ लवकर मिटावा यामध्ये आपण स्वतः लक्ष घालून शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी विनंतीही निवेदनाद्वारे पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केलेली आहे.