हेळगाव येथे ‘मी वडार महाराष्ट्राचा’ शाखेचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:44 IST2021-09-12T04:44:16+5:302021-09-12T04:44:16+5:30
कऱ्हाड : हेळगाव येथे ‘मी वडार महाराष्ट्राचा’ या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी वडार समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित ...

हेळगाव येथे ‘मी वडार महाराष्ट्राचा’ शाखेचे उद्घाटन
कऱ्हाड : हेळगाव येथे ‘मी वडार महाराष्ट्राचा’ या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी वडार समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवी मुंबई वडार समाज संघ यांच्याशी संलग्न असणाऱ्या ‘मी वडार महाराष्ट्राचा’ या संघटनेचे विजयराव चौगुले हे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य संपर्कप्रमुख सुधीर पवार, जिल्हाअध्यक्ष अनिल पिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी रघुनाथ नलवडे होते.
विजय पवार म्हणाले, ‘समाज बांधवांनी संघटित राहणे गरजेचे आहे. आपण एकसंघ राहिलो, तर समाजाचे अनेक प्रश्न आपल्याला सोडविता येणार आहेत.’
आनंदा सावंत यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष शिवाजीराव जगदाळे, सरपंच शारदाताई जाधव, माजी सरपंच बाळासाहेब जाधव, माजी पंचायत समिती सदस्य अशोकराव संकपाळ यांनी मनोगते व्यक्त केली. साहेबराव पवार व शाखा अध्यक्ष सुनील पवार यांनी स्वागत केले. कार्यक्रमास डाॅ.सुनील फडतरे, लक्ष्मण शिंदे, महिला अध्यक्षा निर्मलाताई नलवडे, शशांक बंडीवडार, नवनाथ पवार, दशरथ धोत्रे, अमोल शिंदे, महेश अलंकुठे, अनिल चौगुले, प्रशांत शिंगारे, महेश धोत्रे, संदीप शिंदे, कृष्ण पवार, राज मोहिते, तेजस पवार उपस्थित होते.