कऱ्हाडात मातोश्री ग्रुपच्या ‘क्लिनिकल टेस्टिंग लॅबोरेटरी’चे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:15 IST2021-02-05T09:15:17+5:302021-02-05T09:15:17+5:30

यावेळी मातोश्री ग्रुपचे संस्थापक नवाज सुतार, अख्तर आंबेकरी, मजहरभाई कागदी, बरकत पटवेकर, अशोक भोसले, खायाम मुल्ला, साबीर मुल्ला, वसीम ...

Inauguration of Matoshri Group's 'Clinical Testing Laboratory' at Karhada | कऱ्हाडात मातोश्री ग्रुपच्या ‘क्लिनिकल टेस्टिंग लॅबोरेटरी’चे उद्घाटन

कऱ्हाडात मातोश्री ग्रुपच्या ‘क्लिनिकल टेस्टिंग लॅबोरेटरी’चे उद्घाटन

यावेळी मातोश्री ग्रुपचे संस्थापक नवाज सुतार, अख्तर आंबेकरी, मजहरभाई कागदी, बरकत पटवेकर, अशोक भोसले, खायाम मुल्ला, साबीर मुल्ला, वसीम शेख आदींची उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी युसुफभाई पटेल होते. कोरोना काळात सुरू केलेला अल्पदरात उपचार करणारा दवाखाना, डेंटल क्लिनिक, स्किनकेअर, स्त्री रोग क्लिनिकला मोठा प्रतिसाद लाभला. त्यानंतर या लॅबोरेटरीमध्ये अल्प दरात ब्लड शुगर, सीबीसी आदी अनेक चाचण्या केल्या जाणार आहेत.

यावेळी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी कोरोना काळातील स्थितीचा आढावा घेत त्या कसोटीच्या काळात मातोश्री ग्रुपने दिलेल्या वैद्यकीय सेवेचे कौतुक केले. या सुविधांचा समाजातील सामान्य लोकांना लाभ होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही मनोगत व्यक्त केले. मारुती काटेरे, ए. आर. पवार, आर. डी. भालदार, सागर पाटील, विवेक ढापरे, तलाठी संजय जंगम, प्रमोद तोडकर, जावेद नायकवडी, डॉ. वैभव चव्हाण, प्रमोद पाटील आदी ४० कोरोना योद्ध्यांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. इरफान सय्यद यांनी मनोगत व्यक्त करताना नवाज सुतार यांच्या कार्याचा गौरव केला. कोरोना योद्ध्यांच्या यादीचे वाचन नदीम सिद्दिकी यांनी केले.

फोटो : २८केआरडी०२

कॅप्शन : कऱ्हाड येथे मातोश्री ग्रुपच्या क्लिनिकल टेस्टिंग लॅबोरेटरीचा प्रारंभ सहकारमंत्री बाळासाहेब पाटील व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी बाळासाहेब पाटील यांचे भाषण झाले.

Web Title: Inauguration of Matoshri Group's 'Clinical Testing Laboratory' at Karhada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.