तरडगावमध्ये वाचनालयाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:19 IST2021-02-05T09:19:33+5:302021-02-05T09:19:33+5:30
तरडगाव : लोकांत वाचनाची आवड निर्माण व्हावी. जगभरातील घडामोडींबाबत माहिती मिळून ज्ञानात भर पडावी या उद्देशाने तरडगाव येथे क्रांतिज्योती ...

तरडगावमध्ये वाचनालयाचे उद्घाटन
तरडगाव : लोकांत वाचनाची आवड निर्माण व्हावी. जगभरातील घडामोडींबाबत माहिती मिळून ज्ञानात भर पडावी या उद्देशाने तरडगाव येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले.
तरडगाव (ता. फलटण) ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब मोहिते आणि पाणीपुरवठा समिती अध्यक्ष विजयकुमार शहा यांच्या हस्ते हे उद्घाटन झाले. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक संतोष कांबळे, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब मोहिते, अॅड. आनंद गायकवाड, संदीप गायकवाड यांच्या सहकार्याने हे वाचनालय सुरू करण्यात आले आहे.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत गायकवाड, ग्रामविकास अधिकारी दादासाहेब धायगुडे, शंकरराव गाडे, मोहन अडसूळ, परमेश्वर गायकवाड, नितीन गायकवाड, अमोल गायकवाड, दिलीप निकाळजे, दीपक गायकवाड, वैष्णव गायकवाड, नेताजी खुडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो दि.२७ तरडगाव वाचनालय फोटो...
फोटो ओळ : तरडगाव (ता. फलटण) येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले वाचनालयाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. (छाया : सचिन गायकवाड)
\\\\\\\\\\\\\\\\\