उंडाळे ग्रामीण रुग्णालयात कोरोना सेंटरचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:41 IST2021-05-11T04:41:35+5:302021-05-11T04:41:35+5:30

उंडाळे : कऱ्हाड दक्षिणच्या डोंगरी भागातील जनतेची सोय होण्यासाठी उंडाळे ग्रामीण रुग्णालयात तीस बेडच्या कोरोना केअर सेंटरचे उद्घाटन ...

Inauguration of Corona Center at Undale Rural Hospital | उंडाळे ग्रामीण रुग्णालयात कोरोना सेंटरचे उद्घाटन

उंडाळे ग्रामीण रुग्णालयात कोरोना सेंटरचे उद्घाटन

उंडाळे : कऱ्हाड दक्षिणच्या डोंगरी भागातील जनतेची सोय होण्यासाठी उंडाळे ग्रामीण रुग्णालयात तीस बेडच्या कोरोना केअर सेंटरचे उद्घाटन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे हस्ते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत झाले.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले. कोरोना वार्ड उद्घाटन पृथ्वीराज चव्हाण, सभापती प्रणव ताटे, तहसीलदार अमरदीप वाकडे, प्रांताधिकारी उत्तम दिघे यांच्या हस्ते करण्यात आले. सरपंच संगिता माळी, उपसरपंच बापूराव पाटील, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे शिवराज मोरे, ॲड. नरेंद्र नांगरे-पाटील, शहर काँग्रेस अध्यक्ष प्रदीप जाधव, नगरसेवक आप्पा माने, इंद्रजीत गुजर, तानाजी चवरे, तालुका उपाध्यक्ष नितीन थोरात, उदय पाटील यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘कऱ्हाड दक्षिणच्या डोंगरी भागातील जनतेची सोय व्हावी, यासाठी उंडाळे येथे तीस बेडचे कोरोना सेंटर उभारत आहे. सध्या येथे कोरोना केअर सेंटर म्हणून कामकाज पाहिले जाईल. वैद्यकीय सुविधांचा सुविधांची पूर्तता झाल्यानंतर येथे कोविड सेंटर सुरू होईल.’

बाळासाहेब पाटील म्हणाले, ‘डोंगरी जनतेच्या सोयीसाठी कोविड सेंटर उभारावे अशी या विभागातील लोकांची आग्रही मागणी होती परंतु येथील सुविधांचा अभाव असल्याने कोरोना सेंटर उभारले नव्हते परंतु कोरोनाचा वाढता प्रसार व भविष्यात दिलेला तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून या ठिकाणी डोंगरी विभागातील जनतेसाठी हे सेंटर उभारले जात आहे.’

यावेळी रयत कारखान्याचे चेअरमन ॲड. उदयसिंह पाटील उंडाळकर, कऱ्हाड पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे, तालुका वैद्यकीय अधिकारी संगीता देशमुख, उंडाळे ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. शेखर कोगनुळकर, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, डॉ. जयवंत थोरात, डॉ. सुभाष पाटील यासह मान्यवरांची उपस्थिती होती.डॉ. शेखर कोगनुळकर यांनी स्वागत केले. जिल्हा परिषद सदस्य उदयसिंह पाटील यांनी आभार मानले.

Web Title: Inauguration of Corona Center at Undale Rural Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.