शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

सातारा जिल्ह्यात सहा ठिकाणी दुरंगी, दोन मतदारसंघांत तिरंगी सामना; बंडखोरांमुळे चुरस वाढली 

By नितीन काळेल | Updated: October 30, 2024 19:22 IST

अर्ज माघारीनंतरच अंतिम लढत निश्चित 

नितीन काळेलसातारा : जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांसाठी अर्ज दाखल झाले असून, बंडखोरांनीही दावेदारी ठोकली आहे. त्यामुळे सध्यातरी सहा मतदारसंघांत दुरंगी तर दोन ठिकाणी तिरंगी सामना होण्याचे संकेत आहेत. तरीही ४ नोव्हेंबरला अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशीच अंतिम लढाई कशी असेल, हे स्पष्ट होईल.सातारा जिल्ह्यात विधानसभेचे आठ मतदारसंघ आहेत. यातील काही मतदारसंघांत पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी समोरासमोर आलेले आहेत, तर काही ठिकाणी नवीन उमेदवार नशीब आजमावत आहेत. तरीही ही निवडणूक प्रामुख्याने महाविकास आघाडी आणि महायुतीतच होणार आहे. त्यातच काही मतदारसंघांत बंडखोरीही झालेली आहे. त्यामुळे निवडणुकीचे गणित बदलण्याचीही शक्यता आहे.सातारा मतदारसंघात भाजपकडून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आहेत. तर विरोधात उद्धवसेनेकडून अमित कदम उतरलेत. याठिकाणी उद्धवसेनेच्या एस. एस. पार्टे गुरूजींनीही अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने कदम यांची चिंता वाढणार आहे. वाई मतदारसंघात युतीतील राष्ट्रवादीकडून आमदार मकरंद पाटील मैदानात उतरलेत तर आघाडीतील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने अरुणादेवी पिसाळ यांना उमेदवारी दिली. त्यामुळे लढाईत चुरस निर्माण झाली आहे.पण युतीत बंडखोरी झाली. शिंदेसेनेचे माजी जिल्हाप्रमुख पुरूषोत्तम जाधव मैदानात उतरलेत. त्यामुळे मतदारसंघात तिरंगी सामना होईल. फलटण मतदारसंघात दोन्ही राष्ट्रवादीतच दुरंगी लढत होईल. आघाडीतील राष्ट्रवादीकडून आमदार दीपक चव्हाण तर युतीच्या माध्यमातून सचिन कांबळे रिंगणात आहेत. येथे दुरंगी आणि ‘काॅंटे की टक्कर’ अपेक्षित आहे.माण मतदारसंघात भाजपचे आमदार जयकुमार गोरे चाैथ्या विजयासाठी निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात आघाडीतील राष्ट्रवादीकडून माजी आमदार प्रभाकर घार्गे उतरलेत. याठिकाणी घार्गे यांच्या पाठीशी मोठ्या नेत्यांची ताकद उभी आहे. पण, येथे आघाडीतील नाराज शेखर गोरे यांची भूमिका निर्णायक ठरेल. ते कोणाच्या पारड्यात मते टाकणार की बंधूच्या पाठीशी उभे राहणार, हे महत्त्वाचे आहे.

कोरेगाव, कऱ्हाड उत्तर, दक्षिणमध्ये काटे की टक्कर..

  • कोरेगाव मतदारसंघात  दोन शिंदे आमदारांमध्ये लढत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शशिकांत शिंदे उभे आहेत. तर शिंदेसेनेकडून महेश शिंदे रिंगणात आहेत. ही लढत रंगतदार ठरणार आहे.
  • कऱ्हाड उत्तरमध्येही दुरंगीच सामना आहे. आघाडीतील राष्ट्रवादीकडून आमदार बाळासाहेब पाटील तर ‘भाजप’कडून मनोज घोरपडे नशीब अजमावत आहेत.
  • कऱ्हाड दक्षिण मतदारसंघात काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि ‘भाजप’चे डाॅ. अतुल भोसले यांच्यात पारंपरिक आणि दुरंगीच लढत होईल.
  • पाटण मतदारसंघात तिरंगी सामना होणार आहे. शिंदेसेनेकडून पालकमंत्री शंभूराज देसाई हे सलग तिसऱ्या विजयासाठी मैदानात आहेत. तर आघाडीतील उद्धवसेनेने हर्षद कदम यांना उतरवले आहे; पण येथे आघाडीत बंडखोरी झाली असून, राष्ट्रवादीचे सत्यजितसिंह पाटणकर यांनी अर्ज भरला आहे. यामुळे तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४satara-acसाताराMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुतीwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024