शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात नववीतील मुलीवर ब्लॅकमेल करून बलात्कार; कोल्हापुरातील तरुणाला अटक

By दत्ता यादव | Updated: April 19, 2023 13:39 IST

व्हिडीओ व्हायरलची धमकी देऊन कृत्य

सातारा : शहरातील एका शाळेत नववीत शिकणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीला ब्लॅकमेल करून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी कोल्हापुरातील तरुणावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात पोक्सोचा गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी त्याला अटक केली. व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन संबंधित तरुणाने पीडित मुलीशी हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले.

संकेत मेंगणे (वय १९, मूळ रा. मेंगणेवाडी, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर, सध्या रा. शिक्रापूर, जि. पुणे) असे पोलिसांनी अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित मुलीची आणि संकेत मेंगणे याची इन्स्टाग्रामवर ओळख झाली. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात संकेत हा पीडित मुलीला भेटण्यासाठी तिच्या शाळेजवळ आला. त्यावेळी त्याने तिचे फोटो काढले. त्यानंतर तो तेथून पुण्याला निघून गेला. पुन्हा तो १३ एप्रिलला साताऱ्यात आला. त्यावेळी त्याने त्या मुलीला तुझे फोटो व्हायरल करेन, अशी धमकी देऊन तिला शहरातील एका हाॅटेलमध्ये नेले. या ठिकाणी त्याने तिच्यावर बलात्कार केला. अशा प्रकारे त्याने आणखी दोन ठिकाणी नेऊन दोनवेळा हे घृणास्पद कृत्य केले. त्यानंतर तो तेथून पुण्याला निघून गेला. 

या घटनेमुळे भयभीत झालेल्या मुलीने अखेर हा घडलेला प्रसंग तिच्या आईला सांगितला. आईने मुलीला विश्वासात घेऊन सारा प्रकार जाणून घेतल्यानंतर तातडीने शाहूपुरी पोलिस ठाणे गाठले. आपल्या मुलीवर बेतलेला प्रसंग आईने पोलिसांसमोर कथन केला. त्यानंतर पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी सहा वाजता संकेत मेंगणेवर पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल केला. हा प्रकार गंभीर असल्याने शाहूपुरी पोलिसांची एक टीम तातडीने पुण्याला रवाना झाली. शिक्रापूरमधून पोलिसांनी संकेतला ताब्यात घेऊन अटक केली. त्याला आता न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

तीन ठिकाणी बलात्कार..

संशयित संकेत मेंगणे याने पीडित मुलीवर शहरातील तीन ठिकाणी बलात्कार केला. मुलीच्या शाळेशेजारील ठिकाण, कॅफे आणि हाॅटेलचा त्यामध्ये समावशे आहे. मुलगी अल्पवयीन असताना संबंधित हाॅटेल चालकाने मुलीला लाॅजमध्ये कसा प्रवेश दिला, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतोय. तसेच शहरातील अंधाऱ्या कोठडीतील कॅफेमध्येही गैरप्रकार घडत असल्याचे स्पष्ट होत आहे. 

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिसSatara areaसातारा परिसरkolhapurकोल्हापूर