शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

मेक्सिकोतील गव्हाचे वाण संशोधनासाठी महाबळेश्वरात!, काळा व नारंगी तांबेरा रोगाची होणार चाचणी

By सचिन काकडे | Updated: March 21, 2023 14:17 IST

महाबळेश्वरचे वातावरण गव्हावर पडणाऱ्या तांबेरा रोगावरील विविध प्रकारचे संशोधन करण्यासाठी पोषक

सचिन काकडेसातारा : महाबळेश्वरच्या विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्रात यंदा भारतातूनच नव्हे, तर मेक्सिको या देशातूनही गव्हाचे वाण संशोधनासाठी आले आहेत. या वाणांची संशोधन केंद्रात लागवड करण्यात आली असून, संशोधनानंतर नारंगी व काळा तांबेरा रोग प्रतिकारक्षमता असलेल्या वाणाचा अहवाल मेक्सिकोतील 'सिमिट' संस्थेला पाठविला जाणार आहे.महाबळेश्वरचे वातावरण गव्हावर पडणाऱ्या तांबेरा रोगावरील विविध प्रकारचे संशोधन करण्यासाठी पोषक आहे. त्यामुळे या ठिकाणी १८ मार्च १९४१ रोजी गहू गेरवा संशोधन केंद्राची स्थापना करण्यात आली. दरवर्षी भारतातून सुमारे चार हजार गव्हाचे वाण काळा व नारंगी तांबेरा प्रतिबंध चाचणीसाठी या संशोधन केंद्रात येत आहेत.जागतिक पातळीवर गहू आणि मका पिकावर संशोधन करणारी ‘सिमिट’ ही संस्था मेक्सिको या देशात कार्यरत आहे. या संस्थेतूनही कोरोनानंतर प्रथमच गव्हाचे वाण रोग प्रतिकारक्षमता आजमावण्यासाठी महाबळेश्वरच्या केंद्रात आले आहेत. याठिकाणी लागवड करण्यात आलेल्या गव्हावर काळ्या व नारंगी तांबेरा रोगाचा कसा व किती परिणाम होतो, याचे अचूक निरीक्षण व संशोधन सध्या सुरू आहे. चाचणी पूर्ण झाल्यानंतर तांबेरा रोग प्रतिकारक्षमता असलेल्या वाणाचा अहवाल संस्थेला पाठविण्यात येणार असल्याची माहिती कनिष्ठ गहू रोग शास्त्रज्ञ डॉ. मनीष सुशिर, वरिष्ठ संशोधन सहायक डॉ. संदीप दिघुळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

अचूक निरीक्षण अन् संशोधन...

  • भारतात सिमला, वेलिंग्टन आणि महाबळेश्वर या तीनच ठिकाणी तांबेरा रोगाबाबत संशोधन केले जाते. येथील काचगृहात काळा व नारंगी तांबेराच्या प्रत्येकी २५ प्रजाती जतन करून ठेवल्या आहेत. गव्हावरील विविध प्रायोगिक चाचण्या दरवर्षी शेतकऱ्यांना दाखविल्या जातात.
  • गेल्या आठ दशकांहून अधिक काळ या केंद्राद्वारे तांबेरा रोगाचे अचूक निरीक्षण केले जात असून, आजवर दोन लाखांहून अधिक पूर्व प्रसारित गव्हाच्या वाणांवर तांबेरा प्रतिबंध चाचणी करण्यात आली आहे.

विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्र महाबळेश्वर हे भारतातील गव्हावरील तांबेरा रोगावर संशोधन करणारे महत्त्वाचे संशोधन केंद्र आहे. येथे अखिल भारतीय गहू आणि बार्ली संशोधन संस्था, कर्नाल (हरयाण) येथून दरवर्षी गव्हाच्या पूर्व प्रसारित वाणाची काळा व नारंगी तांबोरासाठी दरवर्षी चाचणी घेतली जाते. - डॉ. विक्रांत साळी, कनिष्ठ वनस्पती रोग शास्त्रज्ञ

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थान