शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

Satara: यशवंत बँक अपहारप्रकरणी एकास अटक, २९ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी; ईडी'ने पाच ठिकाणी टाकले होते छापे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 13:29 IST

या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय (ईडी)कडून मंगळवार, दि. २३ रोजी फलटण आणि कराड येथे पाच वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकण्यात आले

सातारा/कराड : फलटण (जि.सातारा) येथील यशवंत सहकारी बँकेत झालेल्या तब्बल ११२ कोटींच्या आर्थिक अपहारप्रकरणी तपासाचा फास अधिक आवळत सातारा आर्थिक गुन्हे शाखेने शेखर चरेगावकर यांचा दत्तक भाऊ शौनक उर्फ विठ्ठल गोविंद कुलकर्णी (रा.पुणे) याला अटक केली आहे. त्याला कराड न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला सोमवार, दि. २९ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.दरम्यान, या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय (ईडी)कडून मंगळवार, दि. २३ रोजी पहाटेपासून फलटण आणि कराड येथे पाच वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकण्यात आले. या छापासत्रात सुमारे १६ तासांहून अधिक काळ कागदपत्रांची सखोल तपासणी करण्यात आली. मध्यरात्रीनंतर उशिरापर्यंत सुरू असलेल्या या कारवाईत ईडीच्या अधिकाऱ्यांनी या अपहार प्रकरणाशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली असून, पाच जणांना नोटिसा बजावण्यात आल्याचे समजते.याबाबत १२ ऑक्टोबर रोजी कराड शहर पोलिस ठाण्यात यशवंत बँकेतील ११२ कोटींच्या अपहारप्रकरणी शेखर चरेगावकर यांच्यासह सुमारे ५० जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात बँकेच्या ठेवीदारांनी खासदार मेधा कुलकर्णी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेत, संपूर्ण अपहार प्रकरणाची ईडीमार्फत सखोल चौकशीची मागणी केली होती. त्यानंतरच ईडीने फलटण, कराड आणि परिसरात छापासत्र राबवून बँकेच्या शाखांमध्ये जाऊन चौकशी करत आर्थिक व्यवहार तपासले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara: One arrested in Yashwant Bank scam, remanded to police custody.

Web Summary : One arrested in 112 crore Yashwant Bank scam; remanded to police custody until December 29. ED raided five locations, seizing documents and issuing notices in connection with the fraud following depositors' appeal.