आईची महती शब्दात मांडता येत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:13 IST2021-02-06T05:13:03+5:302021-02-06T05:13:03+5:30

कऱ्हाड : आईची महती शब्दात मांडता येत नाही. म्हणूनच साक्षात नारायणालाही आई उमगली नसावी, असे मत राष्ट्रवादी माहिती तंत्रज्ञान ...

The importance of mother cannot be expressed in words | आईची महती शब्दात मांडता येत नाही

आईची महती शब्दात मांडता येत नाही

कऱ्हाड : आईची महती शब्दात मांडता येत नाही. म्हणूनच साक्षात नारायणालाही आई उमगली नसावी, असे मत राष्ट्रवादी माहिती तंत्रज्ञान विभागाचे सारंग पाटील यांनी व्यक्त केले.

कापिल (ता. कऱ्हाड) येथे कल्पवृक्ष संस्थेच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाटील बोलत होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन इंद्रजीत देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी मलकापूरच्या नगराध्यक्षा नीलम येडगे, बाळूताई विठ्ठल ढेबे, भाऊसाहेब ढेबे, वनिता देवकर उपस्थित होत्या.

यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांना रोपांचे वाटप करून त्यांचा सत्कार करण्यात आला. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वाण स्वरूपात रोपांचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी महालक्ष्मी ब्लड बँकेच्या सहाय्याने आयोजित केलेल्या महिलांच्या रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक महिलेला सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात आले. इंद्रजित देशमुख, नीलम येडगे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.

मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, नगरसेविका कमलताई कुराडे, आनंदी शिंदे, संदीप शिसाळ, कृष्णा कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, डॉ. शोभा देसाई, साधना ताटे, ऋषिकेश देवकर, वैशाली ढेबे, महेंद्र भोसले, अमोल पालेकर, गणेश लुबाळ, भारत मस्के आदी यावेळी उपस्थित होते.

फोटो : ०४केआरडी०३

कॅप्शन : कापिल (ता. कऱ्हाड) येथे आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन इंद्रजित देशमुख, सारंग पाटील, नीलम येडगे, बाळूताई ढेबे, भाऊसाहेब ढेबे यांच्या हस्ते करण्यात आले.

Web Title: The importance of mother cannot be expressed in words

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.