शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
धक्कादायक! डीजेच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
3
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
4
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
5
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
6
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
7
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
8
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
9
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
10
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
11
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
12
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
13
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
14
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
15
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
16
लेख : मेट्रोच्या डब्यात वाढदिवस, लग्ने साजरी होतात, तेव्हा...
17
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
18
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
19
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे

रडीचा डाव खेळत नाही; त्यांचा करेक्टर कार्यक्रम लावू; नरेंद्र पाटील यांचा शशिकांत शिंदेंना इशारा 

By नितीन काळेल | Updated: April 20, 2024 18:04 IST

भ्रष्टाचाराच्या गोष्टी सातारकरांना सांगणार

सातारा : आम्ही रडीचा डाव खेळत नाही, कारण मुंबई बाजार समितीतील घोटाळा जुनाच आहे. कर नाही त्यांना डर तरी कशाला हवे. उलट त्यांनी खिलाडूवृत्तीने घ्यावे. या निवडणुकीत बाजार समितीतील भ्रष्टाचाराच्या गोष्टी सातारकरांना सांगून ७ मेपर्यंत त्यांचा करेक्ट कार्यक्रम लावू, असा इशारा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंळडाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी माजी मंत्री शशिकांत शिंदे यांना दिला.

सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, शहराध्यक्ष विकास गोसावी आदी उपस्थित होते. पाटील यांनी संपूर्ण पत्रकार परिषदेत माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लोकसभा उमेदवार शशिकांत शिंदे यांचे नाव न घेता आरोप केले.नरेंद्र पाटील म्हणाले, सातारा लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत मी भाजपकडून शर्यतीत होतो, तसेच पक्षाकडे इच्छाही व्यक्त केली होती. पण, पक्षाने सातारकरांच्या भावनांचा विचार करून उदयनराजेंना उमेदवारी दिली. माथाडी कामगारांची मुंबईत बैठक असल्याने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी येता आले नाही. त्यामुळे आता साताऱ्यात आलो आहे. या निवडणुकीत विरोधी उमेदवाराने अपेक्षा केली असली, तरी मी साथ देणार नाही. जे माथाडी कामगार साथ देणार आहेत, त्यांनीही विचार करावा. कारण, २०१९ च्या निवडणुकीत त्यांच्यामुळेच मला पराभवाला सामोरे जावे लागले.जीवनात कोणासाठी खड्डा करायचा नसतो. माणसाने वयाप्रमाणे वागावे हे त्यांना कळायला हवे. काय चुकीचे केले असेल, तर कारवाईला सामोरे जावे, असे सांगून पाटील पुढे म्हणाले, त्यांच्या गोष्टी टप्प्याटप्प्याने बाहेर येतील. त्यामुळे आताही त्यांनी आत्मपरीक्षण करून उमेदवारीचा निर्णय घ्यावा. माथाडी संघटनेचाही त्यांनी स्वार्थासाठी उपयोग केला.

भ्रष्टाचारात ते खोल गेलेत..ही निवडणूक देशपातळीवरील आहे हे मान्य. पण, समोरील उमेदवाराचा तोल जात आहे. भ्रष्टाचारात ते खोल गेले आहेत. चारवेळा विधानसभा लढलेले आणि आता विधान परिषदेत असलेले कधी अण्णासाहेब पाटील कुटुंबीयांचे झाले नाहीत. त्यांचा कार्यक्रम कोरेगावकरांनी कधीच केला आहे, असेही नरेंद्र पाटील यांनी निक्षून सांगितले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरsatara-pcसाताराlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Shashikant Shindeशशिकांत शिंदे